Guardian Minister List : 'या' तीन नेत्यांना फडणवीस- अजितदादांचा मोठा झटका; ऐनवेळी पालकमंंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर

Mahayuti Government : विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदांचं वाटप रखडलं होतं.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अखेर शनिवारी (ता.18)रात्री उशिरा महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदांचं वाटप रखडलं होतं.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अखेर शनिवारी (ता.18)रात्री उशिरा महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत नव्यानं मंत्रिमंडळात एन्ट्री घेतलेल्या काहीजणांना पुन्हा पालकमंत्रिपदाचीही (Guardian Minister) लॉटरी लागली. पण पालकमंत्रीपदासाठी शर्यतीत असलेल्या तीन नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि अजित पवारांनी 'जोर का झटका' दिला आहे.

महायुती (Mahayuti) सरकारनं सत्तास्थापन आधी शपथविधी झाल्यानंतर काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरुन मतभेद असल्याची माहिती समोर येत होती.त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले आग्रही होते.पण तिथे त्यांचा पत्ताकट झाला असून रायगडच्या पालकमंत्रिपदी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे.

महाराष्ट्रातील पालकमंत्र्याच्या यादीतून गेले दीड महिन्यांपासून पेटलेल्या बीडचे नवे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवले आहे. ते पुण्यासह बीडचीही जबाबदारीही पार पडणार आहे. धनंजय मुंडेंना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण चांगलेच भोवले असल्याचे दिसून येत आहे. मुंडेंना बीडच नाहीतर अन्य कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही.त्यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कॊणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नसणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Mahayuti Guardian Minister : चंद्रकांत पाटलांना सांगलीला आणलं, तर मुश्रीफांना थेट विदर्भात धाडलं; आबिटकरांना शिंदेंचं मोठं गिफ्ट

याआधी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार त्यांच्या 40आमदारांसह सहभागी झाल्यानंतर राज्याच्या कृषिमंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रिपदही सांभाळले होते.पण संतोष देशमुख हत्येप्रकऱणी गंभीर आरोप होत असल्यानं पालकमंत्र्यांची निवड होण्यापूर्वी बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात येऊ नये,अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती.

विशेष म्हणजे दुसरीकडे महायुती सरकारच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत विधान परिषदेच्या भाजप आमदार पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.त्यामुळे महायुतीत बीड प्रकरणाचाच फटका धनंजय मुंडेंना बसल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Uttamrao Jankar : उत्तमराव जानकर येत्या 23 तारखेला मोठा निर्णय घेणार; महाराष्ट्रच नव्हे,तर दिल्लीलाही हादरा बसणार

तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्यानंतरच्या महायुती सरकारमध्ये मंत्रि‍पद हुकल्यानंतर या निवडणुकीत इंदापूरमधून तिसर्यांदा निवडून आलेल्या दत्तात्रय भरणेंना पुन्हा एकदा मंत्रिपदानं हुलकावणी दिली. त्यांनंतर ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.पण काही दिवसांनंतर त्यांनी आपण नाराज नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. पण त्यांना पालकमंत्रिपदाच्या यादीतूनही डच्चू मिळाला आहे.अजित पवारांच्या ते अत्यंत विश्वासू नेते मानले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com