Dhananjay Munde Met Maratha Activieits Nitin Chavan Family News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : मराठा आरक्षणासाठी बलिदान, नितीन चव्हाण यांच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदतीचा हात!

Nitin Chavan sacrificed his life for Maratha reservation. Dhananjay Munde extends financial support : नाथ प्रतिष्ठान कडून एक लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केली. नितीन चव्हाण यांना दोन मुली असून त्या चिमुकल्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही धनंजय मुंडे यांनी स्वीकारली.

Jagdish Pansare

Beed News : मराठा आरक्षण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यात जातीय सलोखा बिघडला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष गावागावात सुरू असताना माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड पोलीस दलात आडनाव न वापरण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कुठेही सामाजिक समता? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थितीत केला होता. मराठवाडा विशेषतः बीड जिल्ह्यातील जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहेत.

अशावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी बलिदान देणाऱ्या अंबाजोगाई येथील तरुण नितीन चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सुगाव येथे जाऊन भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू असताना या आंदोलनाला जाता आले नाही, या आंदोलनात आरक्षणाबाबत तोडगा निघाला नसल्याने नितीन चव्हाण यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

या संदर्भात सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. 30 आॅगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. (Maratha Reservation) चव्हाण यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे जाऊन नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना तातडीची मदत म्हणून नाथ प्रतिष्ठान कडून एक लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केली.

नितीन चव्हाण यांना दोन मुली असून त्या चिमुकल्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही धनंजय मुंडे यांनी स्वीकारली. याशिवाय राज्य शासनाकडून या कुटुंबाला विशेष आर्थिक मदत केली जावी, यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगीतले. धनंजय मुंडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना सामाजिक परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा सवाल करत संताप व्यक्त केला होता.

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती फक्त मराठा समाजानेच साजरी करायची का? महाराजांनी स्वराज्य फक्त मराठ्यांसाठी निर्माण केले नव्हते, तर ते अठरा पगड जातींसाठीही होते, असे म्हणत दोन समाज आणि जातींमध्ये निर्माण झालेल्या तणावावर भाष्य केले होते. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका करत धनंजय मुंडे यांना तुम्ही मजा करा, राजकारण करा, पण मराठ्यांचा नादाला लागू नका, अशा इशारा दिला होता. यातून पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकणार, असे वाटत असतानाच धनंजय मुंडे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT