Dhananjay Munde : "मागे जे घडलं ते सांगायलाही मला लाज वाटते..." बीडमधील सामाजिक परिस्थितीवर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भरभरून बोलले

Dhananjay Munde on Social Equality : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध झाला होता. त्यानंतर बीड पोलीस विभागातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची आडनाव नेमप्लेटवरून हटवून फक्त नाव आणि पद ठेवण्याचे आदेश दिले होते.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 07 Sep : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध झाला होता. त्यानंतर बीड पोलीस विभागातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची आडनाव नेमप्लेटवरून हटवून फक्त नाव आणि पद ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर आता बीडमधील मागील सर्व परिस्थिवर माजी कृषी मंत्री तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात सामाजिक समता उरली नसल्याचं भाष्य केलं आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला. ते बीडमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

Dhananjay Munde
Maharashtra Politics : CM फडणवीसांच्या पेपरमधील 'त्या' जाहिराती कोणी दिल्या? रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा म्हणाले, "भाजपने नव्हे तर, मित्रपक्षातील..."

धनंजय मुंडे म्हणाले, "मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत हे सांगायला देखील मला लाज वाटते. यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे."

Dhananjay Munde
Amol Mitkari : IPS अंजना कृष्णा यांची पुजा खेडकरशी तुलना करणं अमोल मिटकरींना पडलं महागात : माघार घेत म्हणाले, "मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या..."

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का? असाही सवाल केला. ते म्हणाले, "आपण सर्वांनी आपले महापुरुष वाटून घेतलेत महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का? महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मियांसाठी ते उभं केलं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com