
थोडक्यात महत्वाचे :
हैदराबाद गॅझेटनंतर आता 1881 च्या कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरू झाली असून त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे.
गॅझेटनुसार मराठा-कुणबी समाजात रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचे इंग्रजांनी नोंदवले होते.
1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 3 लाख कुणबी व 60 हजार मराठा असल्याचा उल्लेख असून, लोकसंख्या वाढली तरी नोंदीत त्यात वाढ दिसत नसल्याने समाजात शंका निर्माण झाली आहे.
Kolhapur Political News: मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता देण्यात आली. त्यानुसार ज्याच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटची चर्चा सुरू असताना आता कोल्हापूर गॅझेट समोर आले आहे. ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला आहे.
सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून वेळ मागून घेण्यात आला आहे. ही चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर गॅझेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आला आहे. कोल्हापूर गॅझेटची निर्मिती इंग्रजांकडून 1881 साली करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर मराठा आणि कुणबीमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा सुद्धा उल्लेख कोल्हापूर गॅझेटमध्ये आहे.
3 लाख कुणबी आणि 60 हजार मराठा
इंग्रजांनी केलेल्या नोंदीनुसार, 1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाखाच्या घरात होती. त्यामध्ये 3 लाख कुणबी आणि 60 हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे. मात्र, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख इतकी झाली आहे.
लोकसंख्येची पाचपटीने वाढ झाली असताना कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर गॅझेटमध्ये गफलत कुणी केली? असा सवाल कोल्हापुरातील मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर गॅजेटमध्ये नेमकं काय आहे?
1881 साली इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली. या कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आहे. कुणबी आणि मराठा दोघांमध्ये रोटी-बेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख आहे. 1881 साली कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख होती. 1881 साली 3 लाख कुणबी आणि 60 हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे.
Q1: कोल्हापूर गॅझेट कधी तयार करण्यात आले?
A: 1881 साली इंग्रजांनी ते तयार केले.
Q2: कोल्हापूर गॅझेटमध्ये काय म्हटले आहे?
A: मराठा आणि कुणबी एकच असून त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख आहे.
Q3: 1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती होती?
A: सुमारे 8 लाख, त्यात 3 लाख कुणबी आणि 60 हजार मराठा होते.
Q4: कोल्हापूर गॅझेटबाबत प्रश्न का उपस्थित होत आहेत?
A: लोकसंख्या पाचपट वाढूनही कुणबी व मराठ्यांच्या संख्येत वाढ नोंदलेली नाही, यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.