Dhananjay Munde-Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : धनंजय मुंडे शॅडो पालकमंत्री होणार?; अजितदादांचे भन्नाट उत्तर, ‘तुम्ही अजित पवारला किती वर्षांपासून ओळखता?’

Mahayuti Government Dispute : मुख्यमंत्र्यांनी दोन ठिकाणच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली आहे. या दोन्ही ठिकाणी ज्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, त्यांच्याकडून झेंडावंदन करा. मी आल्यानंतर त्याबाबतची चर्चा करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे.

Vijaykumar Dudhale

Jalna, 20 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर बीडमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे शॅडो पालकमंत्री होणार, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना प्रथमच भाष्य केले आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. दौऱ्याहून परत येताना छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बीडच्या शॅडो पालकमंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही अजित पवारांना किती वर्षांपासून ओळखता. मला तुम्ही खूप वर्षांपासून ओळखता ना. मग, अजित पवार तसा वागतो का? मी बीडमध्ये (Beed) गेल्यानंतर तेथील लोकांना कळेल ना.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पालकमंत्री नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. कोणाला पालकमंत्री करावं आणि कोणाच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, याबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या दाओसला गेलेले आहेत. दाओसवरून आल्यानंतर मुख्यमंत्री रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असेही पवारांनी नमूद केले.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दोन ठिकाणच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिलेली आहे. या दोन्ही ठिकाणी ज्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, त्यांच्याकडून झेंडावंदन करा. मी आल्यानंतर त्याबाबतची चर्चा करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे. तसेच, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं. मंत्र्यांना कोणतं खातं द्यायचं, कोणाला पालकमंत्रिपद द्यायचं, हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्या वेळी ते निर्णय घ्यायचे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते निर्णय घेत आहेत.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील वीस आमदार फुटणार, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यावरही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे वीस आमदार फुटणार ही तथ्यहीन बातमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT