Parli News : यंदाची विधानसभा निवडणुक महायुतीसह महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. पण आता मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विजयी झाले आहेत.त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत बघायला मिळाली. शरद पवार (Sharad Pawar) स्वत:मैदानात उतरल्यामुळे परळीत मुंडेंचं टेन्शन वाढलं होतं.पण आता पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली आहे.
विधानसभा 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत बघायला मिळाली होती. मात्र,महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली.त्यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. तर पंकजा मुंडे स्वत: धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.
या सरकारमध्ये परळीचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. राज्याचे कृषीमंत्री म्हणून ते जबाबादारी पार पाडत आहेत. 2019 मध्ये त्यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.
परळी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये झाली. पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघात 1980 मध्ये गोपीनाथ मुंडे कमळ या चिन्हावर विजयी झाले. (BJP) 85 मध्ये पंडितराव दौंड यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1990 पासून 2004 पर्यंत सलग चार वेळा गोपीनाथ मुंडे भाजपतर्फे कमळ चिन्हावर निवडून आले. 2009 मध्ये परळी मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून ते 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीपर्यंत पंकजा मुंडे यांनी भाजपची ही जागा राखली.
2019 मध्ये मात्र इथे बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत झाली आणि त्यात धनंजय मुंडे यांची सरशी होऊन ते विजयी झाली होती. आतापर्यंतच्या नऊ विधानसभा निवडणुकीत कमळ हे चिन्ह मतदारांसमोर होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र महायुती आणि त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला परळी मतदारसंघ जाणार असल्याने इथे कमळ चिन्ह असणार नाही.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे शरद पवार यांच्या रडारवर असलेल्या नेत्यात धनंजय मुंडे यांचे नाव अग्रस्थानी आहे.
राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत, तर काही पिछाडीवर पडले आहेत. परळीत धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. तर राजेसाहेब देशमुख हे पिछाडावर होते. दरम्यान, परळीत मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात लढत होवून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार 701मतांनी पराभव केला होता. यावेळी 3 लाख 6 हजार 710 मतदारापैकी 2 लाख 24 हजार 272 मतदारांनी हक्क बजावत 73 टक्के मतदान झाले होते.
यावेळी धनंजय मुंडे यांना 1 लाख 22 हजार 114 मतदान तर पंकजा मुंडे यांना 91 हजार 413 मतदान पडले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 5 टक्के मतदान जास्त झाले होते. यावेळी मुंडे परिवारही एकत्र आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर धनंजय मुंडेंनी विजय खेचून आणला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.