Maharashtra Election Result : उद्धव ठाकरे महायुतीत आले तर स्वागत करू..., निकालाचं चित्र स्पष्ट होण्याआधीच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Chandrakant Patil statement on Uddhav Thackeray joining Mahayuti: सध्या राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 221 पेक्षा जास्त मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर एकट्या भाजपला 131 जागांवर आघाडी मिळाली आहे.
Chandrakant Patil, Uddhav Thackeray
Chandrakant Patil, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly election 2024 Final results : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं मोठं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सध्या राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 221 पेक्षा जास्त मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर एकट्या भाजपला 131 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला मिळालेलं यश पाहता अंतिम निकाल जाहीर होण्याआधी कोथरूडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. (Vidhan Sabha Election 2024 result live news)

या जल्लोषात भाजप नेते चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं. पाटील म्हणाले, "जर उद्धव ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच करू. मात्र, त्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल."

Chandrakant Patil, Uddhav Thackeray
Maharashtra Election LIVE vote Counting : पहिल्या टप्प्यात महायुतीची आघाडी, 'मविआ'ची धाकधूक वाढली

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय महायुती आता विजयाच्या दिशेने घौडदौड करत असतानाही पाटील यांनी असं वक्तव्य का केलं? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. (Maharashtra Election Assembly 2024 news)

Chandrakant Patil, Uddhav Thackeray
Sanjay Raut : अरंर...! आधी छातीठोकपणे दावा, आता निकालविरोधात जाताच संजय राऊत म्हणतात, 'मोठी गडबड...'

निकालात मोठी गडबड

दरम्यान, भाजप आणि महायुतीला राज्यात मिळत असलेलं यश पाहून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालात काहीतरी मोठी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या समोर येत असलेला निकाल हा जनतेचा कौल नव्हे तर लावून घेतलेला निकाल आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com