dhananjay munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; मंत्रिपदावरही टांगती तलवार ? 'या' प्रकरणात निकटवर्तीय

Beed Political News : धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

सरकारनामा ब्युरो

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच आता पवनचक्की उभारणीसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात अनेकांची नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित नावे या प्रकरणात पुढे येत असल्याने टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे मुंडेंच्या (Dhananjay Munde) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याने पोलीस यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मात्र या सर्व हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

रविवारी नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे हे शपथ घेणार का याकडे लक्ष लागले आहे. त्यातच हत्या, खंडणी प्रकरणामुळे आता मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव या खंडणी प्रकरणात समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत येथील आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाव न घेता धनंजय मुंडेंबाबत केली होती.

दरम्यान, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह विरोधकांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT