
Congress President : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त करा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी काँग्रेसकडून युवा चेहरा देण्याच्या हालचाल सुरू झाल्या आहेत.
प्रदेशाध्यक्षांसाठी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील (Satej Patil), सांगलीतून विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे नाव आघाडीवर आहे. या दोघांपैकी एकाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 105 जागा काँग्रेसने लढवल्या. मात्र केवळ 16 जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. विधानसभेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहितआपल्याला पद मुक्त करा अशी मागणी केली.
पटोले यांच्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षवर कोण असणार? याची चर्चा आता काँग्रेसमध्ये चांगलीच रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला युवा चेहऱ्यांनी तारल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावर युवा चेहरा आणणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी दिल्ली हाय कमांडवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. कोल्हापुरातून आमदार सतेज पाटील यांचे नाव काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.
कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार आमदार निवडून आणले. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आणले. तर या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली होती. शिवाय निवडणुकीतही उमेदवार निवड समितीमध्ये त्यांची भूमिका राहिली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
आमदार सतेज पाटील यांच्यासोबत सांगलीचे आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांचे नाव देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्यांना विजयी करण्यापर्यंतची भूमिका कदम यांची होती. राज्यात महायुतीचा करिष्मा चालत असताना लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसने मैदान मारले असे चित्र या पाटील आणि कदम यांनी करून दाखवले होते. त्यामुळे या दोघांचे नाव सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.