Jalna, 01 February : मस्साजागेचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. मात्र, अडचणीत सापडलेल्या मुंडेंच्या मदतीला भगवानबाबा गडाचे महंत नामेदव शास्त्री धावून आले आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देताना भगवान गड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी भूमिका घेतली आहे. त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
जालना येथे माध्यमांशी बोलताना नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांच्या भूमिकेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे, ती नामदेव शास्त्री यांची भूमिका आहे. त्यावर मी काही सांगण्याचे कारण नाही. मला त्या भेटीवर अथवा पाठिंब्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही.
भगवानगडाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचललेली आहे. यावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, त्या संदर्भात नामदेव शास्त्री काय म्हणाले आहेत, हे मी ऐकलेलं नाही. ते काय म्हणाले असतील, तर ती सर्वस्वी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेवर मी व्यक्त होण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण, प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्यामुळे फक्त बातमी होते, बाकी काही होत नाही.
धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव आहे, असे मला तरी वाटत नाही. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अजून तसा विषय धनंजय मुंडेंकडे उपस्थित केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे, असे मला तरी दिसत नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध आढळला तर आम्ही कारवाई करू. त्यांचा संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची भूमिका आहे. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. सर्वार्थाने तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आहे. तपास यंत्रणेतून जे काही पुढे येईल, त्यावर राजीनाम्याचा विषय अवलंबून आहे. आपल्याला कोणालाही त्याबाबतची सविस्तर माहिती नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.