Dhananjay Munde: धनंजय हा गुन्हेगार नाही; नामदेव शास्त्री यांच्याकडून मुंडेंची पाठराखण

Beed Santosh Deshmukh Murder Conspiracy : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यांनी आज भगवान गड येथे नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed, Jan 2025: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

त्यांनी भगवान गड येथे नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत मुंडे यांची पाठराखण केली. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, हे मी शंभर टक्के सांगतो. जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde
Suresh Dhas: सुरेश धसांनी अजितदादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये दडलंय काय? 500 जण कोमात...

धनंजय मुंडे यांनी घर फुटल्यापासून त्याने खूप काही सहन केले आहे. ते ५३ दिवसापासून प्रचंड त्रास सहन करीत आहेत. खंडणीवर जगणारे मुंडे नाहीत.

त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही, गोपीनाथ मुंडे यांचा तो पुतण्या आहे. त्यांचे मित्र राजकारणात आहे.आज मुंडेंच्या हाताला सलाईन आहे, संवेदनशील मुद्दावरुन राजकारण करणं ही चुकीची पद्धत आहे, असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Munde
Bhai Uddhavradada Patil: हेच खरे भाई अन् दादाही! ज्यांनी CM पदावर सोडले पाणी, मात्र पक्ष सोडला नाही!

गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे हे रात्री भगवान गड येथे आहे. ते भगवान गड येथे ते मुक्कामी आहे. आज ते भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे.

सामाजिक कार्यक्रर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्री यांना माहीत नाही, मुंडे यांच्याबाबते कागदपत्र त्यांना पाठविण्यात येतील. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरुन पत्रकार परिषद घ्यायला नको होते, असे दमानिया यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com