Congress Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : धाराशिवमध्ये राडा! झेडपी निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतच जुंपली; काँग्रेस-ठाकरे सेनेचे कार्यकर्ते भिडले

Maharashtra local election tension News : काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv Politics: धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक निकाल जाहीर होऊन सात दिवस उलटले आहेत. एकीकडे नेतेमंडळीत आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडल्या आहेत त्यामुळे वाटातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यात वादाचे प्रकार घडत आहेत. त्यातूनच कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडला.

जिल्हा परिषद निवडणूक निकलानंतर कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट आमनेसामने आले आणि बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण झाली. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत डिकसळ गटातून मस्के कुटुंबातील वर्षा मस्के या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शीतल वनकळस या उमेदवार होत्या. प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी पांडुरंग कुंभार यांनी वर्षा मस्के यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.

या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) पूजा तुषार शिंदे विजयी झाल्या. प्रचाराच्या काळात झालेल्या राजकीय भूमिका आणि परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच तणाव होता. याच पार्श्वभूमीवर वर्षा मस्के यांचे दीर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद वाढला. हा वाद पाहता पाहता दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये तुफान राड्यात परिवर्तित झाला. चौकात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली.

यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT