BJP News : निवडणूक आयोगात तक्रार देणाऱ्या बंडखोराच्या गाडीला अपघात; गंभीर जखमी नेत्यावर सोलापुरात उपचार

Mohol Accident : मोहोळजवळ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्ञानेश्वर वाकडे गंभीर जखमी झाले आहेत.
Accident
AccidentSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 February : जिल्हा परिषद निवडणुकीत आमदाराने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार देण्यासाठी गेलेले बंडखोर नेते ज्ञानेश्वर वाकडे यांच्या गाडीला मोहोळजवळ महामार्गावर अपघात झाला. या अपघातात बंडखोर ज्ञानेश्वर वाकडे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. वाकडेंच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ज्ञानेश्वर वाकडे यांनी पत्नीला निलंगा तालुक्यातील तरवडी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी होती. मात्र, त्यांच्या पत्नीला पक्षाने तिकिट नाकारले होते, त्यामुळे वाकडे यांच्या पत्नीने बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या काळात आमदाराने मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, असा दावा करत त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी वाकडे हे मुंबईला गेले होते.

मुंबईत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर ते आपल्या गाडीने लातूरकडे परत येत होते. प्रत्यक्षदर्शी शेतकरी देवानंद भिमराव सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार , हायवेवर रोडच्या बाजूला सुरक्षा कठड्याला लागून 2 ट्रेलर असलेला एक ट्रॅक्टर थांबला होता. त्यावेळी एक कार पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगामध्ये येऊन थांबलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रेलरला धडकली.

Accident
Rahul Narvekar viral Video : नार्वेकरांनी पळ का काढला?; तुम्ही सांगताय की मी सांगू?; विधानसभा अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल करत संजय राऊतांचा सवाल

जवळ जावून पाहिले असता कारची समोरील बाजू ट्रेलरच्या पाठीमागील बाजूस खाली घुसलेली होती. संबंधित ट्रॅक्टरचालक व जमलेल्या लोकांनी कारमधील लोकांना बाहेर काढले व उपचारासाठी सीएनएस हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवून दिले. या अपघातात वाकडे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकडे यांच्यासह गाडीतील तीन चे चार जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिकांनी तसेच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले आहे. वाकडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com