Nashik NCP : सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर हालचाली, हेमलता पाटील यांच्या नाराजीनाट्यावर तुर्त पडदा

NCP Group Hemlata Patil Registration Controversy : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते पद डॉ. हेमलता पाटील यांना हवे होते. मात्र ते सीमा ठाकरे यांना देण्यात आल्याने हेमलता पाटील नाराज झाल्या. त्यांनी वेगळी चूल मांडली होती.
Sunetra Pawar,Hemlata Patil,
Sunetra Pawar,Hemlata Patil,Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गटनेतापदावरून तीव्र अंतर्गत वाद उफाळून आला होता. पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गटनेतापदावर दावा सांगितला होता. मात्र गटनेतेपदासाठी पक्षाकडून सीमा रंजन ठाकरे यांच्या नावाचे नियुक्तीपत्र आल्याने व सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी निवड केल्याने प्रभाग १२ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील नाराज झाल्या.

महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची तसेच पक्षासोबत अपक्ष किंवा अन्य पक्षांची युती, आघाडी करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करणे बंधनकारक असते. दिवंगत नेते व पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवार यांच्या निधानामुळे पक्षाची गटनोंदणी लांबली होती. त्यानंतर झालेल्या गटनोंदणी प्रक्रियेला डॉ. हेमलता पाटील गैरहजर राहिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटनेते पदावरून निर्माण झालेल्या वादातून डॉ. पाटील यांनी स्वतंत्रपणे नोंदणी केली.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे एकूण चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्या गटात अपक्ष निवडून आलेले मुकेश शहाणे यांनी देखील नोंदणी केली आहे. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना राष्ट्रवादीच्या सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करून त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांची गटनोंदणी करण्यात आली. मात्र, हेमलता पाटील यांनी नाराजीतून आपली वेगळी चूल मांडल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला.

Sunetra Pawar,Hemlata Patil,
Narhari Zirwal : धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंनंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री अडचणीत : नरहरी झिरवाळांकडून थेट राजीनाम्याचीच तयारी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते पद डॉ. हेमलता पाटील यांना हवे होते. स्व. अजित पवार यांनी त्यांना शब्द दिल्याचा त्यांचा त्यांनी केला. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर घाणेरडे राजकारण करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करून कोणीतरी बनावट पत्र बनवले आणि मला गटनेते पदापासून दूर करण्यात आले असा गंभीर आरोप पाटील यांनी केला होता.

Sunetra Pawar,Hemlata Patil,
Narhari Zirwal : धक्कादायक ! मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मंत्रालयातील कार्यालय सील, अडचणी वाढण्याची चिन्हे; नेमकं काय झालं?

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने गटनोंदणी करताना सीमा ठाकरे यांच्या नावाचे पत्र दिल्याने हेमलता पाटील यांनी गटात नोंदणी न करता स्वतंत्र नोंदणी केली होती. परंतु, आता या वादावर तुर्त पडदा पडला आहे. त्याचे कारण यासंदर्भात माजीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मध्यस्ती करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गटनोंदणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती डॉ. हेमलता पाटील यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी देखील ॲड. कोकाटे यांचा फोन आल्यानंतर गटनोंदणीसाठी नगरसेवकांना हजर राहण्याचे कळविल्याची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com