Dharashiv Lok Sabha Election Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha Election : '...तर राजकारण सोडेन' ; राणा जगजितसिंहांचं ओमराजेंना ओपन चॅलेंज!

Lok Sabha Election 2024 : "ओमराजे निंबाळकर हा खोटारडा आहे. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहे. या खोट्या आरोपांबाबत आम्ही फौजदारी कारवाईचा विचार करत आहोत.."

Chetan Zadpe

Dharashib News : राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजा नाईक निंबाळकर यांच्यात नवा सामना रंगला आहे. धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर होतं, असं आव्हान राणा जगजितसिंह यांनी दिलं. प्रेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमधील रुग्णांच्या उपचारावरुन दोघांमध्ये हा नवा वाद पेटला आहे. चुकीचे आरोप करु नका, अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा त्यांनी ओमराजेंना दिला आहे. (Latest Marathi News)

ओमराजेंचा आरोप -

"धाराशिवला १९९३ मध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं. ते मुंबईला घेऊन गेले. खरंतर इथे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेजची गरज होती. मुंबईच्या लोकांना गरज होती का या कॉलेजची? पण कॉलेज बांधल कुठं तर मुंबईला. मतं इथल्या लोकांची घ्यायची, आणि हॉस्पिटल मुंबईत (Mumbai) थाटायंच. ते कॉलेजसुद्धा सरकारी मालकीची नाही. प्रेरणा ट्रस्टच्या मालकीचं केलं. स्वत:च्या मालकीचं केलं," असा आरोप ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणा जगजितसिंह पाटलांचं आव्हान -

विरोधक खोटारडा आहे. इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं, असं काही झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा. हे सिद्ध केलं तर मी राजकारण कायमंच सोडून देतो. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हा खोटारडा आहे. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहे. या खोट्या आरोपांबाबत आम्ही फौजदारी कारवाईचा विचार करत आहोत, असे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT