BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...

Lok Sabha ELection 2024 : स्वत:साठी केलं होतं मतदान, निवडणुकीवर काय परिणाम होईल..
BJP Candidate Sarvesh Singh Dies
BJP Candidate Sarvesh Singh DiesSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त आहे. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वेश सिंह यांचे निधन झाले आहे. विशेष कालच पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांसाठी मुरादाबादमध्ये मतदान पार पडले. भाजप उमेदवार सर्वेश सिंह हे देखील मतदानासाठी आले होते. आज त्यांचे निधन झाले आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्याच्या दातांमध्ये काही समस्या होती. त्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्रास वाढल्यावर ते उपचारासाठी दिल्ली एम्समध्ये गेले. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून सर्वेश सिंग हे एकमेव ठाकूर समाजातील उमेदवार होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Candidate Sarvesh Singh Dies
NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

सर्वेश सिंह यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर ठाकूरद्वारातून विधानसभा निवडणूक लढवली होती. यानंतर सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवला. ठाकूरद्वारा मतदारसंघात सिंह यांची जागा घेऊ शकणारा नेता भाजपला अजूनही मिळाला नाही. भाजपने मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा सर्वेश सिंह यांना उमेदवारी दिली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सिंह हे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनकडून सुमारे 50 हजार मतांनी पराभूत झाले होते. 2014 मध्ये ते सपाचे डॉ. एसटी हसन यांचा पराभव करून भाजपने पहिल्यांदा मुरादाबादची जागा जिंकली होती. 2019 मध्ये सपा-बसपा युतीतून आलेल्या एसटी हसनकडून सर्वेश सिंह यांचा पराभव झाला होता.

यावेळी भाजपने सर्वेश यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत त्यांना चौथ्यांदा तिकीट दिले. सर्वेश सिंह यांचे वडील राजा रामपाल सिंह हे देखील ठाकुरद्वारातून चार वेळा आमदार होते आणि एकदा अमरोहा येथून खासदार झाले होते. सर्वेश सिंह यांचे पुत्र सुशांत सिंह सध्या बिजनोरच्या बधापूर मतदारसंघातून भाजपचे (BJP) आमदार आहेत.

BJP Candidate Sarvesh Singh Dies
Congress Vs Bjp : एमआयएमची उमेदवारी हे भाजपचे पडद्यामागील षडयंत्र ! काँग्रेसचा आरोप
BJP Candidate Sarvesh Singh Dies
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही -

नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा मतदानापूर्वी मृत्यू झाल्यास निवडणूक (Lok Sabha) रद्द होते. येथे यापूर्वीच मतदान झाले आहे, त्यामुळे सध्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. मतमोजणीनंतर सर्वेश सिंह विजयी झाल्यास ही जागा रिक्त घोषित करून फेरनिवडणुकीची प्रक्रिया होईल. सर्वेश सिंह यांच्या विरोधात सपाने रुची वीरा यांना उमेदवारी दिली होती. सर्वेश सिंगची रुची वीराशी स्पर्धा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com