Eknath Shinde Dharashiv Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha Constituency : प्रवीणसिंह परदेशींना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ ? चर्चांना उधाण

CM Eknath Shinde: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून इच्छुकांची संख्या डझनभराहून अधिक आहे

Shital Waghmare

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांपैकी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अतिरिक्त सचिव राहिलेले प्रवीणसिंह परदेशी यांचे दौरेही सध्या जिल्ह्यात वाढले आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 फेब्रुवारी रोजी ट्विट करून धाराशिव जिल्ह्यात नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचे श्रेय प्रवीणसिंह परदेशी यांना दिले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून एका निवृत्त अधिकाऱ्याचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केल्याने ते प्रवीणसिंह परदेशींना पाठबळ तर देत नाहीत ना ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून इच्छुकांची संख्या डझनभराहून अधिक आहे .पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हाभरात भावी खासदार म्हणून स्वतःचे फलक लावले होते.

भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanajagjeetSinh Patil) हे ही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. तर माजी खासदार असलेले प्रा. रवींद्र गायकवाड यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही दंड थोपटत विद्यमान ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवृत्त अधिकारी प्रवीण सिंह परदेशी (Pravinsinh Pardeshi) यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.

मित्रा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रवीणसिंह परदेशी सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात धांडोळा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एका सर्व्हेक्षण संस्थेने मतदार संघातील नागरिकांना फोन करून त्यांच्या विषयी माहिती गोळा केली होती. 1993 मध्ये झालेल्या भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात परदेशी यांचे महत्त्वाचे योगदान होते. धाराशिव जिल्ह्याला पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. यातच त्यांनी लोकसभेचे इच्छुक उमेदवार असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांचा आवर्जून उल्लेख केला. या ट्विटनंतर परदेशी यांना मुख्यमंत्री पाठबळ देत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT