CM Eknath Shinde : कार्यकर्ता मेळावा औटघटकेवर, अन् मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौराच नाही !

NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde : आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका मेळावे सर्वत्र सुरू आहेत. यातच पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेर येथे 15 फेब्रुवारीला दौरा प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र हा कार्यक्रम औटघटकेवर आला असतानाही मुख्यमंत्र्यांचा दौराच जाहीर झाला नसल्याने कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.

नेर येथील आजंती मार्गावरील सुप्रभा मंगल कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा आणि जिल्हा पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत शासनाकडून अधिकृत माहिती आली नसून मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Farmer Audio Clip Viral | मोदी सरकारचे नाव घेताच शेतकरी भडकला, ऑडिओ क्लिप व्हायरल | Yavatmal

फ्लेक्स, होर्डिंग, सोहळ्यादरम्यान जमणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यवस्था, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, तसेच कार्यक्रमस्थळाची पाहणी आदी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत जरी जाहीर झाले नसले तरी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने जागेची चाचपणी प्रशासनाकडून झाल्याचे कळते. येत्या १५ तारखेला संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. तेथूनच नेर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागातील आजी-माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी तसेच इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावे, अशी गळ पालकमंत्री राठोड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातली होती. त्याच दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. मात्र आत्तापर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. असे असले तरी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसेंसह उदय सामंत यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांचेही दौरे घोषित न झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

Edited By : Atul Mehere

Eknath Shinde
Yavatmal - Washmim : स्त्री-पुरुष समानतेच्या निव्वळ बाताच, आरक्षणाचं नेमकं होणार काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com