Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष निवडीवरून मोठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. याठिकाणी महायुतीला बहुमत मिळाले असले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी मंत्री तानाजी सावंत गट भाजपला पाठिंबा देण्यास तयार नसल्याने घडामोडीना वेग आला आहे. तानाजी सावंत यांच्या गटाला वगळून भाजपकडे काठावरील बहुमत आहे. त्यानंतरही झेडपी अध्यक्ष निवडीचा घोळ कायम आहे. त्यासाठी गेल्या एकही दिवसापासून मुंबईत खलबतं सुरु आहेत.
त्यातच धाराशिवचे पालकमंत्री कामानिमित्त मुंबई बाहेर गेले असल्याने महायुतीमधील चर्चा थांबली आहे. सरनाईक मुंबईत परतल्यानंतर चर्चेला वेग येणार आहे. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री फडणवीस यांना तर शिंदे शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत बोलणी करून निर्णय देण्याचे अधिकार सोपवले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून येत आहे. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6 तर अपक्ष 3 व शिंदेंच्या शिवसेनेचे 2 असे 31 जणांचा गट मुंबई, कोकण मार्गे कर्नाटकात सहलीवर पाठवला आहे. तर दुसरीकडे तानाजी सावंत यांनी त्यांचा गट पुण्यातच ठेवला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटाचे मुंबई दरबारी काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
त्यातच पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाजपला अडीच-अडीच वर्षाचा पदाधिकारी निवडीचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्याच्यावर चर्चा सुरु आहे. मात्र, भाजपकडून या फॉर्म्युल्याला अद्याप होकार दर्शविण्यात आला नसून महायुतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली असे सांगतले जात आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत बोलणी करून निर्णय देण्याचे अधिकार सोपवले आहेत. त्यामुळे आता हे दोघेजण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच भाजपने (BJP) मोठा दावा टाकला आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले समर्थक शिवसेनेचे बंडखोर उमेदवार उमरगा तालुक्यातील आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील व परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या उद्धव ठाकरे गट समर्थक अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे तसेच हे दोघेही भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गटात दाखल झाले आहेत. या घडामोडीमुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे.
त्यानंतर मंगळवारी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. त्यामुळे सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.