Pune BJP: दहा ते पंधरा जण आले अन् दिल्या टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा; पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?

BJP Congress clash Pune : पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी टिपू सुलतानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले.
Police detain protesters raising Tipu Sultan slogans near Pune BJP office during heightened political tensions.
Police detain protesters raising Tipu Sultan slogans near Pune BJP office during heightened political tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतचे वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन येथे काढलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्या ठिकाणी दगडफेक देखील झाली. त्याबाबत दोन्ही बाजूच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर यापुढे आंदोलनाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणानंतर भाजप कार्यालय वर काँग्रेसचे आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयावर मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे.

Police detain protesters raising Tipu Sultan slogans near Pune BJP office during heightened political tensions.
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

अशातच मंगळवारी (ता.17) सायंकाळी दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयाजवळ येत घोषणाबाजी केली असल्याचे पाहायला मिळालं. मास मोमेंट संघटनेचे हे कार्यकर्ते होते. हे कार्यकर्ते अचानक आल्याने पोलिसांची देखील धांदल उडाली. यावेळी त्यांनी टिपू सुलतान याचे काही फोटो देखील हातात घेतले होते.

Police detain protesters raising Tipu Sultan slogans near Pune BJP office during heightened political tensions.
Pune PMC : पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर राजकीय व्यक्तीचा स्वीकृतसाठी अर्ज : महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाचा घेतला आधार

तसेच टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही दिल्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिले असल्याचं समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com