Sunil Tatkare, Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha Election News: धाराशिवचा अखेर 'सस्पेन्स' संपला; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटलांना उमेदवारी

Political News : धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबत्त सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला.

Sachin Waghmare

Lok Sabha election : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची लगबग जोरात सुरु असून राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबत्त सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला.

हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यानंतर आता उमेदवार कोण असणार यावरून मोठी चर्चा रंगली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवाराबाबतचा सस्पेन्स संपला असून धाराशिव लोकसभेच्या उमेदवाराची सोमवारी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या धाराशिव मतदारसंघातील तिढा सुटला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटली असली तरी आता उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम होता. बुधवारीच महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार याचा शोध जवळपास संपला असून सोमवारी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Dhrashiv Lok Sabha News)

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे यांचे नाव चर्चेत आहेत. यापैकी विक्रम काळे यांनी निवडणूक लढण्यास नकार दर्शविला असल्याचे समजते. रविवारी दुपारी देवगिरी बंगल्यावर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी धाराशिवच्या उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे.

सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा उमेदवाराची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी चर्चेत असलेल्या आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे यांच्या नावाशिवाय अचानक नवीन नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणाजगजितसिंह पाटील सागर बंगल्यावर

दरम्यान, रविवारी दुपारी भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsinh Patil) यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी धाराशिवच्या जागेवरून दोघांमध्ये खलबत्त झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या भेटीत काय ठरले हे समजू शकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT