dhananjay munde Ajit Pawar bajrang sonawane sarkarnama
मराठवाडा

Beed Politics Video : अजितदादांच्या समोरच बजरंग सोनवणे धनंजय मुंडे भिडले! दहशतीचा मुद्दा निघालाच...

DPDC Meeting dhananjay munde VS bajrang sonawane :बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे सुरेश धस बजरंग सोनावणे यांच्यात बाचाबाची झाली.

Roshan More

Beed Politics Video : बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.

या बैठकीमध्ये धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे, सुरेश धस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. स्वतः सोनवणे यांनी ही माहिती मीडियाला दिली.धनंजय मुंडे यांचे नाव न घेता बजरंग सोनवणे म्हणाले, माजी पालकमंत्री म्हणाले अधिकाऱ्यांवर दहशत आहे. तेव्हा आम्ही म्हणालो कुणावर दहशत आहे त्याचे उत्तर द्या. त्याच्यावरून आमची बाचाबाची झाली.

बीडची बदनामी होत असल्याच्या मुद्यावर देखील सोनवणे म्हणाले की, 'आम्ही म्हणालो की आम्ही चोऱ्या करतो का? राखेचा धंदा करतो का? खंडणी मागतो का? मटका चालवतोय का? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही जनतेसमोर आणण्याचे काम करतोय. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या विषयी आम्ही न्याय मागतोय.'

डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये जर कोणी एकाला काॅर्नर करून बोलले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील खासदार सोनवणे यांनी दिला.

हे मुद्याचे भांडण

पत्रकारांनी सुरेश धस यांना धनंजय मुंडेंसोबत झालेल्या बाचाबाची विषयी विचारले असता ते म्हणाले, बाचाबाची किरकोळ विषय आहेत. येवढे तेवढे होत असते. हे विषयी मीडियाच्या समोर यायला नको. मीडियासमोर येण्या येवढा हा विषय मोठाही नाही. हा गुद्दाच्या विषय नाही मुद्द्याचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT