Raigad Guardian Ministership Controversy : रायगड पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला, पालकमंत्रिपदावर शिंदेसेना ठाम

Raigad Guardian Ministership : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू वाद विकोपाला गेला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी विषय संपल्याचे सांगितले आहे.
sunil tatkare And bharat gogawale
sunil tatkare And bharat gogawaleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता असून वाद विकोपाला गेला आहे. एकीककडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी विषय संपल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्रिपदावर शिंदेसेना ठाम असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. तर पालकमंत्रीपदासाठी राजकीय कारकिर्दीची पर्वा नसल्याचे इशारा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद पुन्हा उफाळून आला असून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात असून गोगावले यांनी पुन्हा एकदा तटकरे यांना लक्ष केलं आहे. तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तीशी सेटलमेंट केल्याचा दावा गोगावले यांनी केला आहे.

तर महेंद्र दळवी आमदार होऊ नये यासाठी खासदार तटकरे यांनी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. माझ्या देखील परभवासाठी तटकरेंनी विरोधकांशी हातमिळवणी केली असा आरोप गोगावले यांनी केला आहे. यामुळे आता रायगडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून रायगड शिंदेसेनेलाच मिळायला हवे अशी मागणी शिंदे यांच्या शिवसेनेनं केली आहे.

दरम्यान याच मागणीवरून शिंदेनेनेचे मंत्री भरत गोगावलेंसह, आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे भेट झाली नाही. यावेळी येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं गोगावलेंनी सांगितलं.

sunil tatkare And bharat gogawale
Sunil Tatkare to Hasan Mushrif : 'मंत्री मुश्रीफसाहेब फोन थांबवा'; तटकरे भर मंचावरून अचानक असं का म्हणाले?

यावेळी रायगडमधील पालकमंत्रिपदाबाबत आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवल्या आहे. आता तेच निर्णय घेतील. पण पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण असल्यामुळेच सुनील तटकरें हे पचणी पडत नसल्याचे गोगावले यांनी म्हटलं आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद आम्हालाच मिळालेच पाहिजे, असा आग्रह आमदार महेंद्र थोरवे यांनी धरला आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत थोरवे यांनी आपल्याला राजकीय कारकिर्दीची पर्वा नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच पालकमंत्रिपद घेणारच, हा आमचा निर्धार असल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले आहे.

sunil tatkare And bharat gogawale
Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा फुगा फुटला, पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला; गोगावले यांची नाराजी

एकीकडे शिवसेना नेते रायगड पालकमंत्रिपदाबाबत दबावतंत्र निर्माण करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी देखील सिवसेनेला डिवचले आहे. यामुळे या वादात आणखी तेल पडले असून वाद चिघळण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील बहिणीला पोरखं करणार नाहीत ते महिलांचा सन्मान करतील असे म्हणत एक प्रकारे रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्याकडे राहिल असे संकेत दिले आहे. तर सध्या हा आमच्यासाठी प्रश्न मिटला असून याचा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोडल्याचही चव्हाणांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com