Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरेंना विधानसभा निकालावर संशय, CM फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला; म्हणाले...

Raj Thackeray On Mahayuti Assembly Election Results 2025 : महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला.ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा.कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला 132 जागा मिळाल्या, हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा ?
Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 230 जागा जिंकून सत्ता काबीज केली. यावेळी भाजपला 132, शिवसेनेला 57,राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांच जिंकता आल्या. या निकालावर विरोधकांनी संशय व्यक्त केला जात आहे.

यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आता विरोधकांच्या संशयाला हवा पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे. पण आता राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात विषय संपवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहे.यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले,मी अजून राज ठाकरे नेमकं काय बोललेत हे पाहिलेलं किंवा वाचलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी महाराष्ट्रात आल्यावर बोलेन, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत सुरु असलेलं उपोषण आता स्थगित करण्यात आलं आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्युस दिला आणि त्यांचं उपोषण सोडवलं.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Solapur DPC Meeting : अवैध वाळूउपशावरून पालकमंत्री गोरे आक्रमक; ‘वाळूतस्करांवर कारवाई करा; अन्यथा जिल्ह्यात नोकरी...’

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अखेर सहाव्या दिवशी आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं.यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं आहे.लवकर अमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करेन, तेव्हा मुंबई जाम होऊ शकते, यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत,असंही मनोज जरांगे म्हणाले.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं याचा आनंद आहे.आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत, ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न करत असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

फडणवीसांनी यावेळी जरांगे पाटील कायद्याच्या चौकटीतील ज्या ज्या मागण्या करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चित मान्य करू. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर योग्य प्रतिसाद सरकारकडून मिळेल अशी ग्वाही पण त्यांनी दिली.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Beed Visit : अजितदादांनी धक्का दिलेल्या आमदार धसांना 'सीएम' फडणवीस ताकद देणार; बीड दौर्‍याची तारीख ठरली

वरळी येथे मनसेच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले.यावेळी त्यांनी आपल्या शैलीत महायुतीसह विरोधकांनाही टोले लगावले. ते म्हणाले,सहा दिवस आधी मोदी म्हणतात की, 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आतमध्ये टाकू,पण आम्हाला माहिती नव्हतं, आत म्हणजेच मंत्रिमंडळात टाकणार आहेत. ते आतमध्ये टाकू याचा अर्थ मंत्रिमंडळात टाकू आहे, हे पहिल्यांदा मला कळले, असाही टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

राज ठाकरे यांनी गुरुवारी(ता.30) पहिल्यांदाच विधानसभा निकालावर रोखठोक आणि सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले,महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला.ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा.कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला 132 जागा मिळाल्या, हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा ?

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Supriya Sule : 'त्यांचं अन् मुख्यमंत्र्यांचे घर काही मिनिटांवर, मग दावोसला जाण्याचं कारण काय?' सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल

राज ठाकरे म्हणाले, लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली 4 ते 5 आमदार असतात त्यांचे 15 आमदार आले ? शरद पवार यांचे 8 खासदार आहेत, त्यांचे इतके कमी आमदार ? चार महिन्यांत फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं, कसं झालं? हा संशोधनाचा विषय असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीच्या या मतदानावर जाऊ नका.लोकांनी आपल्याला मतदान केलय फक्त ते आपल्यापर्यंत आलेल नाही हे लक्षात घ्या. अश्या प्रकारच्या जर निवडणुका होत असतील तर त्या न लढवलेल्या बऱ्या, असा संतापही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com