Pankaja Munde, Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News: 'माझ्या वाटेला जाऊ नका'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंच्या टीकेवर पलटवार

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे प्रचार सभेत नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच माजी मंत्री पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरून टोला लगावला होता. त्याला शुक्रवारी मनोज जरांगेनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून 'माझ्या वाटेला जाऊ नका' अशा शब्दांत पंकजा मुंडेंना सुनावले आहे.

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या सभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. 'विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला आहे. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.', अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर जरांगेंनी 'बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.' असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या पंकजा मुंडे यांना त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले. 'मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.', अशा स्पष्ट शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.' त्यामुळे जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंना त्यांना त्यांच्या कर्तव्याची देखील आठवण करून दिली होती. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा शब्द दिलाय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्याने ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा, कॅबिनेटमध्ये तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचे कर्तव्य आहे.'

SCROLL FOR NEXT