Pankaja Munde News : उपोषण करून आरक्षण मिळत नसतं; पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर जरांगे पाटील ?

Political News : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

Beed News : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच माजी मंत्री पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरून टोला लगावला आहे.

आतापर्यंत मनोज जरांगे यांच्या भूमिकेला समर्थन म्हणणाऱ्या भाजपच्या (Bjp) राष्ट्रीय सचिव व लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी आता त्यांच्या भूमिकेवर टोला लगावला आहे. कोणतेही आरक्षण बेमुदत उपोषण केल्याने मिळत नसते, आरक्षण देणे हे राज्य सरकारचे काम आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Chhatrapati Sambhaji Nagar Constituency : खैरे राजकारणातून रिटायर्ड होणार; पण नेमकं कधी ?

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला आहे. त्याबाबत अध्यादेश काढून आरक्षणाचा निर्णय घेणे आणि ते कोर्टात टिकवणे हे त्यांचे कर्तव्य, असल्याचे पंकजा मुंडे जाटनांदूर (ता. शिरुर कासार) येथील गुरुवारी (ता. १८) सभेत म्हणाल्या. यावेळी आमदार सुरेश धस, चंपावती पानसंबळ, रोहीदास गाडेकर आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कधीच कोणत्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विरोध केला नाही. आरक्षण हे आर्थिक निकषावर नाही तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर दिले जायला हवे. जिल्ह्याचे प्रश्न खंबीरपणे संसदेत मांडू, कायद्याने ज्या गोष्टी मिळणारच आहेत. त्यासाठी उपोषण करण्याची आवश्यकता नाही, असेही पंकजा मुंडे मनोज जरांगे यांचे नाव न घेता म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत पहिले भाषण देणार

मी कुणाचेही आडनाव वा जात विचारणार नाही. मी जोडण्याचा धागा होणार आहे, तोडणारी कात्री नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. महागाई वाढत आहे. शेतमालाला भाव मिळत नाहीये आणि त्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान होत आहे. परंतु, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत पहिले भाषण देणार आहे. असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Pankaja Munde
Pankaja Munde News : पंकजा मुंडे म्हणाल्या, '... तर तुमचं 'ते' कर्ज मी व्याजासकट परत करेन !'

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com