Suresh Kute Sarkarnama
मराठवाडा

Suresh Kute News : 32000 कोटींचा समूह; पण सुरेश कुटेंचा आयुष्यात एकदाच विमान प्रवास! कारण काय ?

Datta Deshmukh

Beed Political News : दहा हजार कोटी रुपयांचे ब्रँड व्हॅल्यू आणि 32000 कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या द कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी आपल्या आयुष्यात फक्त एकदाच विमान प्रवास केला आहे. विशेष म्हणजे हा प्रवासदेखील त्यांना मजबुरीने करावा लागला.

वडील ज्ञानोबाराव कुटे कापड दुकानाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची व्यावसायिक सुरुवात करणाऱ्या येथील सुरेश कुटे यांनी 27 वर्षांपूर्वी बीडमध्ये तेल व पेंडनिर्मिती उद्योगात पाय ठेवले. तिरुमला उद्योगाच्या माध्यमातून व्यावसायिक सुरुवात करताना त्यांनी नंतर विविध क्षेत्रात काम करत नवनव्या कंपन्यांची उभारणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता त्यांच्या समूहात खाद्य तेल, खोबरेल तेल, पेंड, लॉजिस्टिक, डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध कंपन्यांचा कुटे समूह झाला आहे. विशेष म्हणजे बीडमधील उभारलेल्या या समूहाचे देशभरात नऊ राज्यांत जाळे आहे.

त्यांच्या तेल उद्योगाने गुजरातपर्यंत भरारी घेतली आहे. उद्योग क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या समूहाच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनीदेखील काम केलेले आहे.

दरम्यान, 27 वर्षांपासून उद्योग क्षेत्रात पाय रोवलेल्या आणि राज्य तसेच विविध नऊ राज्यांत आपला काम करणारे या समूहाचे 10 हजार कोटी ब्रँड व्हॅल्यू, तर बाजारमूल्य तब्बल 32 हजार कोटी रुपयांचे आहे. मात्र, या समूहाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी या 27 वर्षांत केवळ एकदाच विमान प्रवास केला, तोही मजबुरीनेच.. (Latest Political News)

नेमके काय घडले ?

महिनाभरापूर्वी द कुटे ग्रुपची आयकर विभागाने नियमित तपासणी केली. त्यांच्या समूहाची ही नियमित तपासणी जरी असली तरी अलीकडच्या काळात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या विभागांचे छापा सत्र चांगले चर्चेत असते.

त्यामुळे कुटे ग्रुपवर हा छापा पडला अशी अफवा त्यांच्या व्यवसायिक स्पर्धकांनी उठवली. त्यामुळे सुरेश कुठे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडाली.

अचानक ठेवीदार आल्याने ज्ञानराधाचे आर्थिक नियोजनदेखील ढासळे. त्यामुळे ज्ञानराधाची आर्थिक घडी बसविण्यासाठी सुरेश कुटे यांनी आपल्या या कुटे समूहात गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला. त्यांनी अदानी समूहासह डाबर, डोमेस्टिक आदी विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी बोलणी सुरू केली. मात्र कोणाशीही त्यांचा सौदा जुळत नव्हता. (Maharashtra Political News)

दरम्यान, त्यांनी दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संपर्क केला. रॉयल फॅमिलीची भारतीय उद्योगातील गुंतवणूक पंतप्रधान कार्यालयाचे मार्फतच होते. त्यांनी आपल्या उद्योगातील खाद्यतेल, हेअर ऑइल, डेअरी कंपन्यांची हिस्सेदारी रॉयल फॅमिलीला देण्याचा सौदा केला.

याबाबत प्रधानमंत्री कार्यालयाची मान्यता, इतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी त्यांना दिल्लीला जाणे आवश्यक होते. मात्र या काळात विविध कंपन्यांशी बोलणी करण्यासाठी सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी व या समूहाच्या कार्यकारी संचालक अर्चना कुटे रोज पुण्याला जात. मात्र, वेगळ्या चर्चा टाळण्यासाठी त्या कोणत्याही स्थितीत रात्री बीडलाच परतत.

...म्हणून घडला विमान प्रवास

यापूर्वीच नजीकच्या काळात येथील जिजाऊ मल्टिस्टेटमधील आर्थिक घोटाळा समोर आलेला होता. त्यामुळे सुरेश कुटे व अर्चना कुटे बीडलाच असून, कुठेही गेलेले नाहीत, हा विश्वास ठेवीदारांमध्ये कायम राहावा म्हणून ते रोज पुणे बीड वारी करत.

परंतु दिल्लीला जाऊन परत येणे शक्य नसल्यामुळे त्यांना विमान प्रवास करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते नवी दिल्ली व नवी दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास केला.

या प्रवासात त्यांनी रॉयल फॅमिलीशी साडेचार हजार कोटी रुपयांचा सौदा केला आहे. यातील 300 कोटी रुपये महिनाभरात मिळणार आहे, तर चार हजार दोनशे कोटी रुपये दोन टप्प्यात पुढील सहा महिन्यांत मिळणार आहेत.

'आपल्याला विमान प्रवासाची प्रचंड भीती असल्याने आपण यापूर्वी बीड ते मुंबई बीड ते सुरत बीड ते दिल्ली असे प्रवास वाहनाने केल्याचे सुरेश कुटे सांगतात. मात्र, विमानात बसण्याची प्रचंड भीती असली तरीही ज्ञानराधा पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला विमानाने जावे लागले,' सुरेश कुटे सांगतात.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT