Sharad Pawar - Anil Patil : शरद पवारांचा मंत्री अनिल पाटलांवर एवढा राग का...? 'हे' आहे कारण

NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीत अनिल पाटील (Anil Patil) अजित पवार गटासोबत गेले अन्....
Sharad Pawar - Anil Patil
Sharad Pawar - Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

सचिन वाघमारे-

Pune News : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजून नवखे आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले अनिल पाटील हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले व प्रथमच आमदार झाले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीत अनिल पाटील (Anil Patil) अजित पवार गटासोबत गेले अन् त्यांना पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यानंतर ते सुसाट वेगाने निघाले आहेत व त्यातूनच त्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले दिसतील, असे विधान केले आणि हे विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले.

Sharad Pawar - Anil Patil
Radhakrishna Vikhe News : राज्यात भाजपचं नेतृत्व कोण करणार? मंत्री विखेंनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

जळगाव जिल्ह्यात अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. भाजपचे जिल्ह परिषद सदस्य असलेल्या अनिल पाटील यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत त्यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली व प्रथमच ते आमदार झाले. जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकमेव विधानसभा जिंकता आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकमेव आमदार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तेही त्यांच्यासोबत पक्ष सोडून बाहेर पडले. त्यांना राज्यांचे मदत व पुनर्वसन हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. प्रथमच आमदार आणि मंत्रिपद असा लाभ त्यांना झाला. त्यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. पहिल्याच टर्ममध्ये सर्व काही त्यांना मिळाले.

त्यातच दोन दिवसापूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांची बारामतीत भेट झाली हॊती. त्याची प्रसारमाध्यमातून चर्चा रंगली असताना अनिल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले दिसतील, असे विधान केले. त्यामुळे या अनिल पाटलांच्या विधानाचा शरद पवारांनी समाचार घेत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

मी जालना जिल्ह्याचा नुकताच दौरा केला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचाही यावेळी दौरा केला . मतदारसंघातील अनेक नागरिकांशी मी बोललो. तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या दाव्यामुळे अजित पवार(Ajit Pawar) गटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता येत्या काळात अशाप्रकारचे वक्तव्य करीत असताना सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar - Anil Patil
Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com