Jalgaon News : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. वेळोवेळी त्यांच्या विधानांवरून हे दिसून आले आहे. नुकतच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजानांवर निशाणा साधला.
दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल गिरीश महाजन यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. ज्यावर आता गिरीश महाजनांनी(Girish Mahajan) जोरदार पलटवार केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गिरीश महाजन म्हणाले, ''एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून नव्हे तर, पक्षात राहून त्यांनी चोऱ्या, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पक्षाने हाकलून दिले. त्यामुळे दाऊदच्या संभाषणामुळे आपल्याला पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नाही.'' असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, '' एकनाथ खडसे(Eknath Khadse) ज्या फोटो वरून आरोप करत आहेत, ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरूंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील आहेत. खडसे हे आता मानसिक तणावात आहेत. भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेली नोटीस त्यामुळे त्यांची परिस्थिती केवीलवाणी झाली आहे.'' असं महाजनांनी म्हटलं आहे.
याचबरोबर ''काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही, त्यामुळे वाटेल ते बेछूट आरोप करत आहेत. मात्र एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नाही. एकनाथ खडसे एकेकाळी आमच्या सोबत होते त्यामुळे ते आमचे जुने सहकारी मात्र आता त्यांची कीव करावी वाटते. एकनाथ खडसेंमुळे त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले. ते आता वैफल्यग्रस्त झाले आहेत.'' असंही टोला गिरीश महजनांनी लगावला.
तर, ''सलीम कुत्ता प्रकरणी त्यांनी जे आरोप केले त्यावरून त्यांच्यावर हक्क भंग आणणार आहे. दहा वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरू यांच्या विवाह सोहळ्यात सर्व आमदार खासदार सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. त्या लग्नात काही लोक आक्षेपार्ह होते असे आरोप होत आहेत . मात्र त्याबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या विवाह सोहळ्यात आम्ही सर्व उपस्थित होतो हे आम्ही मान्य करतो. यापूर्वीही याविषयी चर्चा झालेली आहे त्यामुळे हा नवीन विषय नाही. असं महजनांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच, ''वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून खडसेंकडून अशा प्रकारे आरोप केले जात आहेत. सलीम कुत्ता कोण आहे मला माहिती नाही आणि मी ओळखतही नाही.'' अशा शब्दांमध्ये महाजनांनी खडेसेंच्या आरोपास प्रत्युत्तर दिले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.