Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde : शिंदे गटाच्या अंतर्गत झगड्याची भाजपकडून दखल : आमदारांना समज देण्याची शिंदेना विनंती!

सरकरनामा ब्युरो

Eknath Shinde : हिवाळी अधिवेशन संपून आता एक आठवडा होत आहे, तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागल्याने, शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचेदिसून येत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. आपल्याच गटातला एक नेता विरोधकांना माझ्याविरूद्ध पुरावे पुरवत असल्याचा दावा केला. यामुळे शिंदे गटात धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले.आता या सर्व प्रकारची भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चांगलीच दखल घेतली असून, धुसफूस करणाऱ्या आमदारांना समाज देण्यात यावी, असे सांगितल्याचे समजते.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांपासून, आपल्याला धोका असल्याचे जाहीर विधान केले. सत्तारांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा अंगुली निर्देश हा संजय शिरसाट यांच्याकडे होता. शिरसाट यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार करताना, मराठवाड्यातून सत्तार याना मंत्रिपद दिल्याने आणखी मराठवाड्यातील मंत्री नकोत, असे भाजपच्या नेत्यांनी सूचित केल्याने शिरसाट यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळले गेले.

सत्तारांचा टीईटी घोटाळा बाहेर येणे, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागितल्यानंतरही प्रकरण वाढवणे, गायरान जमिनीच्या वाटपावरून उठलेले वादंग, कृषी महोत्सवाच्या आयोजनासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट देऊन वसुली करण्याचा आरोप याच्यामागे आपल्याच पक्षातील एक नेता असल्याचं कृषिमंत्री सत्तार यांचा दावा आहे.

या सर्व वादंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच कृषी महोत्सवाच्या उद्घाटनात हे प्रकरण थांबवण्याचा सल्ला आपल्याच गटातील सदस्यांना दिला आहे. याबाबत त्यांना भाजपच्या श्रेष्ठींकडूनच अंतर्गत वाद ना वाढवण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे समजते.

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या आत सुरु झालेली सुंदोपसुंदी सरकार चालवताना डोकेदुखी ठरणारे आहेच, त्याचबरोबर असेच अंतर्गत वाद सुरु राहिले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो. याबाबत भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना सावध केले आहे. तसेच त्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही या वादाचे स्थानिक पातळीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. ही शक्यता विचारात घेता, एकनाथ शिंदे यांच्यावरच हा वाद संपवण्याची जबाबदारी भाजपच्या नेत्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT