Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर ठाकरेंचे मित्र, पण महाविकास आघाडीपासून 'वंचित'च!

Prakash Ambedkar : शिवसेना ठाकरे गटाने एक मध्यम मार्ग काढले आहे.
Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोगेंद्र कवाडे यांच्याशी राजकीय सूत जुळत असताना, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश कधी होणार, असा प्रश्न विचारला जात होता. आता याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाने एक मध्यम मार्ग काढले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांसोबत नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचा मित्र पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे स्थान महाविकास आघाडीत राहणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीपासून सुरक्षित अंतर ठेवले, असून शिवसेनेने त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत युती करावी, असा एक मध्यममार्ग काढण्यात आला आहे. लवकरच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीबाबत एकत्रित पत्रकार परिषद होणार असली तरी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Aurangabad : सत्तारांच्या मैत्रीखातर विखे पाटलांची कृषी महोत्सवाला भेट..

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झाली असून, लवकरच ती जाहीर केली जाईल, असे सुतोवाच नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. मात्र त्याचबरोबर वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उघड तर काँग्रेसचा छुपा विरोध असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून ‘वंचित’ने येण्यास आमची हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

वंचितच्या मविआ समावेशास विरोध का ?

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सीमावादासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरले होते. यापासून शिवसेनेने फारकत घ्यावी, असेही आंबेडकर यांनी सुचवले होते. यानंतरच वंचित महाआघाडीपासून दूर होत गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मविआत वंचितच्या समावेशासाठी विरोध वाढतगेला, असे सांगणयात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com