Bhandara Gondiya : महाआघाडीत धुसफूस : खंजीर खुपसल्याच्या वक्तव्यानंतर, पटोले - पटेल वादाचा नवा अंक!

Gondiya Bhandara : नाना पटोले यांचे वक्तव्य महाविकास आघाडीत फूट पाडणारे
Nana Patole | Prafull Patle
Nana Patole | Prafull Patle Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara Gondiya : दिवसभर सुरु असलेल्या महावितरणाचा संपाच्या तिढा सुटत नाही, तोच कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एक नवीन राजकीय वादंग निर्माण केले असून, भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांची भाजप सोबत मैत्री असल्याच्या गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला. यामुळे आता नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्यातील वाद पुन्हा चवाटयावर आला आहे.

पटोले आणि पटेल यांच्यातील वादामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पड़ण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस निर्माण झाली आहे.एकीकडे कांग्रेसचे इतर वरिष्ठ नेते हे राष्ट्रवादीशी सूत जुळवून महाविकास आघाडी बळकट करत असताना, नाना पटोले यांचे वक्तव्य महाविकास आघाडी सरकार मध्ये फूट टाकण्याचे काम करीत आहे।

Nana Patole | Prafull Patle
Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

आज गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याच्या तानुटोला बिरसा मुंडा यांच्या पुतळयाच्या अनावराच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पटोलेंनी हे वक्तव्य केले आहे. शिंदे सरकारने नुकतेच हेक्टरी 15 हजार रुपये धानाला बोनस जाहिर केला आहे. मात्र हा बोनस शेतकरी विरोधी असून, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असे राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी गोंदियात म्हटले होते. यावर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी प्रफुल पटेल हे गोंदियात कसे आंदोलन करणार? त्यांची तर भाजपसोबत मैत्री असल्याचे खोचक वक्तव्य केले आहे. प्रफुल पटेल कसे क़ाय आंदोलन करणार? असे ही नाना पटोले यांनी वक्त्वव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंगास सुरुवात झाली आहे।

नाना पटोले यांनी वरील वक्तव्याने पाठीत खंजीर खुपसल्याच्या वाद पुन्हा उकरुन काढला आहे. गोंदियात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने आपल्या परंपरागत मित्र कांग्रेसला डावलून भाजप सोबत सत्ता स्थापन केली, यावेळी राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आज नाना पटोले यांना बोनसबाबत राष्ट्रवादीची शिंदे-फडणवीस सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका घेतल्यावर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, त्यांनी प्रफुल पटेलांची भाजप सोबत मैत्री काढून नवीन वाद निर्माण केला आहे.

Nana Patole | Prafull Patle
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर ठाकरेंचे मित्र, पण महाविकास आघाडीपासून 'वंचित'च!

एकीकडे भाजपने लोकसभेचे रणशिंग फुकले असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रात सभेचा सपाटा लावत असतांना, दूसरीकड़े महाविकास आघाडी अंतर्गत वादाने ओढ़ली जात आहे. महाविकास आघाडीला हे परवडणारे नाही. दरम्यान एकीकडे कांग्रेसचे इतर वरिष्ठ नेते राष्ट्रवादीशी सूत जुळवून महाविकास आघाडी बळकट करण्यात प्रयत्नशील असतांना, कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य महाविकास आघाडी सरकार मध्ये फूट टाकण्याचे ठरणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com