Shiv Sena Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

ShivSainiks detained : एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मोठा राडा होणार होता? पोलिसांकडे आलेली 'ती' गुप्त माहिती आणि चक्रं फिरली!

Political News : धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त अहवालातून समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी प्राप्त झालेल्या आलेली गुप्त माहितीमुळे पोलिसांनी चक्रे फिरवली असल्याचे पुढे आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा विविध कारणांनी गाजला. धाराशिव येथील एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमापासून काही शिवसैनिकांना दूर ठेवण्यात आले. विशेषतः त्यांना पोलिसानी नजरबंदीत ठेवले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या शिवसैनिकांना नजरबंदीत ठेवण्याचे मोठे कारण समोर आले आहे. धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त अहवालातून समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी प्राप्त झालेल्या आलेली गुप्त माहितीमुळे पोलिसांनी चक्रे फिरवली असल्याचे पुढे आले आहे.

धाराशिव येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवला आले होते. यावेळी काही शिवसैनिक घोषणाबाजी करणार होते. त्यांना तसे मेसेज पाठवण्यात आले होते. अन्याय झाला म्हणून भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाला खतपाणी घालून त्यांना घोषणाबाजी करण्यास चिथावणी देणे आणि शिवसेनेत फूट पाडायची, अशी योजना होती. एकनाथ शिंदे यांनी आता पोलिसांचा गोपनीय अहवाल मागवून घेतला आहे.

यामध्ये कोणत्या शिवसैनिकांची नावे आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा अहवाल पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात घोषणबाजी करण्यासाठी फूस लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

काही शिवसैनिक शिंदेंच्या या कार्यक्रमात घोषणाबाजी करणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांना या सगळ्याचा सुगावा लागला आणि त्यांनी वेळीच पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त अहवालातून समोर आली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी काही शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवले होते. तर काही शिवसैनिकांना कार्यक्रमाला न जाण्याचा नोटिसा धाडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो या पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. कोणावर अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT