ZP President Election: भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेचा 'करेक्ट कार्यक्रम', जिल्हा परिषदेत सत्तेपासून ठेवतेय दूर!

BJP vs Shivsena ZP President: भाजप रणनीती आखत जिल्हा परिषदेमधील सत्तेपासून शिवसेनेला दूर ठेवत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
BJP strategy against Shinde Shiv Sena in ZP election
BJP strategy against Shinde Shiv Sena in ZP electionSarkarnama
Published on
Updated on

BJP politics Maharashtra: महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून दूर ठेवल्याची खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या सेनेतील नेते त्यामुळे अस्वस्थ असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विषयी तक्रार देखील केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे सदस्य फोडत भाजपने सत्ता स्थापन केली.तर, परभणीमध्ये ऐनवेळी शिवसेनेला बाजुला ठेवत राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली.त्यामुळे भाजप रणनीती आखत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे मत झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, भाजपने येथे देखील शिवसेनेला सत्तेत सोबत घेतले मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदापासून दूर ठेवले. केवळ 15 सदस्य असलेल्या भाजपचा अध्यक्ष आणि 16 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष झाला आणि 21 सदस्य असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद आले नाही. भविष्यात शिवसेनेला हे पद मिळणार का याची देखील स्पष्टता नाही.

BJP strategy against Shinde Shiv Sena in ZP election
Satara ZP : साताऱ्यात ZP अध्यक्ष भाजपचाच? जयकुमार गोरे लागले कामाला : दोघांना संपर्क सुरु; चौघांना अनुपस्थित ठेवण्याचा प्लॅन?

साताऱ्यात काय होणार?

सातारा जिल्हा परिषदेमध्ये देखील त्रिशंकु अवस्था आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी सुरुवातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चर्चा झाली होती. मात्र, नंतर ही चर्चा काहीशी थंडावली आहे. त्यामुळे महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपकडून पुन्हा दगाफटका होण्याची भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे काही सदस्य फोडत सत्ता स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार असल्याचीही चर्चा आहे.

BJP strategy against Shinde Shiv Sena in ZP election
Satara ZP President : सातारा ZP साठी भाजपचे नवे डावपेच; शिवेंद्रराजेंवर मोठी जबाबदारी, वरिष्ठ पातळीवर ठरणार रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com