Satara ZP President Election : सातारा झेडपीत भाजपसोबत जाण्याचं शिवसेना आमदारानं केलं समर्थन; एकनाथ शिंदेंच्या बंडाचा दिला दाखला...

Mahesh Shinde's Clarification : महेश शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्य ठरवत 2019 चा संदर्भ दिला. कोरेगावातील निवडणूकपूर्व युतीमुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 Mahesh Shinde-Shambhuraj Desai
Mahesh Shinde-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 21 March : राज्यात २०१९ मध्ये शिवसेना ही भाजपसोबतची निवडणूकपूर्व युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली होती, त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाजूला निघून गेलाे होतो, आज साताऱ्यात तीच परिस्थिती निर्माण झाली होती. कोरेगावात आमची भाजपसोबत निवडणूकपूर्व युती होती, त्यामुळे निवडणुकीनंतरही भाजपसोबत जाणं योग्य होतं, तसं महेश शिंदे वागला, त्यात माझं काय चुकलं, असं मला वाटत नाही, असे सांगून सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपसोबत जाण्याचं शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी समर्थन केले.

आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणाले, कोरेगावात आम्ही भाजपसोबत निवडणूकपूर्व युती केली होती. चार जागा शिवसेना आणि तीन जागा भाजप लढणार, असे आमचं तिकिट वाटप झालं होतं. शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते. आम्ही भाजपसोबत निवडणूकपूर्व युती केली होती. पण हे लोक विरोधकांसोबत जायचं म्हणतात, हे आमच्या सदस्यांना कळालं. त्यातल्या त्यात आम्हाला घड्याळासोबत जायला काही अडचण नव्हती. पण महाविकास आघाडीसोबत जाणं मला उचित वाटलं नाही.

शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही सदस्य राष्ट्रवादीच्या विरोधात लढून निवडून आले आहेत. त्यांना वाईट वाटलं. कोरेगावात आमची भाजपसोबत निवडणूकपूर्व युती होती, त्यामुळे आमच्या सदस्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदी योग्य होता, हे माझ्या वतीने स्पष्टीकरण आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, त्यांनी मला कुठल्याही बैठकीला बोलावलं नव्हतं. त्यांच्या बैठकीचे फोटो पाहिले, तर पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अशाच झाल्या आहेत. त्याचे माझ्याकडे फोटो आहेत.

 Mahesh Shinde-Shambhuraj Desai
Satara ZP : शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट : ‘कामेश कांबळेंनी मतदान केलं नसतं; तर भाजपचा बी प्लॅन तयार होता, राष्ट्रवादीचे 5 सदस्य...’

शशिकांत शिंदे हे आमचे राजकीय विरोधक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत कुठल्या तोंडाने जाऊ शकतो. जाऊच शकत नाही. आम्ही त्यांच्याविरोधात कोरेगावमध्ये लढलोय, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. पण तेच तुतारी विसरून घड्याळाकडे गेले आहेत, यांचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमचे नेते आहेत, असं त्यांनी जाहीर केलं पाहिजे. साताऱ्यात येऊन आमच्या नेत्यांची मापं काढली जातात, त्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही महेश शिंदे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री करत असतात. पोलिस प्रशासन आणि सर्व यंत्रणा ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या असतील, असं मला वाटत नाही. अपहरणाचा गुन्हा असलेल्या सदस्यांनी अगोदर वॉरंट तोडायला हवं होतं. अटकपूर्व जामीन घ्यायला हवा होता. पोलिस प्रशासनात पालकमंत्र्याएवढं कोणाचंही चालत नाही.

 Mahesh Shinde-Shambhuraj Desai
Satara ZP : शंभूराज देसाईंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणाऱ्या भाजपच्या खेळीत शिवसेना आमदारही सहभागी; एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष!

पालमंत्र्यांच्या मला हे वाटतं. त्यांची लोकं त्यांच्यासोबत राहिली नाहीत. त्यांची राष्ट्रवादीसोबत निवडणूकपूर्व युती होती, त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबत गेले. शिवसेनेची संख्या राहिली, पण राष्ट्रवादीची संख्या त्यांच्यासोबत राहिली नाही, त्याची चिडचिड पोलिसांवर करून चालत नाही, असा टोलाही महेश शिंदे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com