Eknath Shinde Shiv Sena Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde Shiv Sena Jalna : जालन्यात शिंदे शिवसेनेत दिवाळीच्या दिवशीच बंडाचा भडका! तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Eknath Shinde Shiv Sena faces internal unrest Jalna Mantha-Partur office bearers resign over district chief Asaram Borade working style ahead of his visit : जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी; पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम राबविल्याचा आरोप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना दौऱ्यावर.

Pradeep Pendhare

Jalna Mantha-Partur office bearers resign : महायुती सर्वात मोठा मित्रपक्ष भाजपबरोबर राज्यभर संघर्ष सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सामना करावा लागत आहे. जालना शिवसेनेत दिवाळीच्या दिवशीच पक्षांतर्गत संघर्ष उफाळला असून, मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजानीमा दिला आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे उद्या (ता. 9) सोमवारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरा करण्यासाठी जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याचपूर्वी हा पक्षांतर्गत संघर्ष उफाळल्याने शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षांतर्गत वाद उफळला असून, मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आसाराम बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले. मात्र पदाधिकाऱ्यांना डावलत पक्षाचेव कार्यक्रम परस्पर राबवत आहेत. याच कार्यपद्धतीनेला कंटाळून मंठा-परतूर येथील तालुकाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवारी (ता. 9) जालना दौऱ्यावर आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांनी, मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे उपमुख्यमंत्री शिंदे सोमवारी दुपारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर परिसरातील शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, अशी माहिती दिली.

एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असल्याने या नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार का? जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीविषयी नेमक्या काय तक्रारी आहेत, हे जाणून घेणार का? मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे संवाद साधणार का? अशा अनेक प्रश्नांवर पक्षांतर्गत चर्चा आहेत. नाराज पदाधिकारी नेमक्या कोणाच्या संपर्कात आहेत, याची देखील माहिती एकनाथ शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT