Bazar Samiti News  Sarkarnama
मराठवाडा

Bazar Samiti News : इस्लापूर अन् माहूरच्या पराभवानंतर किनवट बाजार समितीच्या मतदारांचे भाव वधारले...

Nanded Politics News : नांदेड जिल्ह्यातील किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

Amol Jaybhaye

साजीद खान

Mahur News : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला. त्यात राष्ट्रवादी सेना युतीचे 18 पैकी 14 तर भाजप आणि काँग्रेसचे फक्त चार उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी किनवट तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती. या त्यामुळे या निकालाचे पडसाद किनवट तालुक्यात उमटले असून आता आपला गड शाबूत ठेवण्याची भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे मतदारांचे वजन कमालीचे वाढले आहे.

माहूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल सगळ्यांना धक्का देणारा ठरला. याची पुनरावृत्ती किनवटमध्ये होऊ नये म्हणून सर्वच नेते व उमेदवार धास्तावले आहेत. किनवटमध्ये उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी प्रचारावर जोर दिला आहे. इस्लापूर, किनवट, माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत्यांनी अभद्र युती करून मतदारांना आचंबित केले.

विशेष, म्हणजे इस्लापूर, किनवट आणि माहूरला या तीन ठिकाणी वेगवेगळ्या भुमिका घेऊन आपापल्या चुली मांडल्याने भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पुरते हसे झाले आहे. देशात भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र असतांना येथे मात्र एकदम उलट झाले. राजकीय तमाश्यात आधी इस्लापुरमध्ये भाजप व राष्ट्रवादीची युती झाली, माहूरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एक झाले तर किनवटमध्ये भाजप व कॉंग्रेस (Congress) पक्षाची विचित्र युती झाल्याने या तिन्ही ठिकाणच्या तमाशाच्या फडात कोणता पक्ष कोणत्या नेत्यांसोबत आहे, हे लोकांना कळलेच नाही.

इस्लापुर आणि माहूर निकालामुळे आता किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली पोहोचले असतानाच मात्र, राजकीय पक्षांना आजची रात्र वैऱ्याची ठरणारी आहे. माहूरच्या अपयशानंतर आता किनवटमध्ये भाजपचा गड शाबित ठेवण्याचे आमदार भीमरावजी केराम यांच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता किनवट ची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दुसरीकडे माहूरच्या दणदणीत विजयामुळे माजी आमदार प्रदिप नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यात नवा उत्साह संचारला आहे.

उद्याच्या रणधुमाळीत आज मतदारांचे वजन मात्र वाढले आहे. विशेष, म्हणजे या तिन्ही ठिकाणी राजकीय पक्षांनी घेतलेली युतीच्या भूमिकेमुळ सामान्य माणसाचेच नव्हे तर कार्यकर्त्यांचाही विश्वास आपापल्या नेत्यांवर राहिलेला नाही हे दिसून आले आहे. माहूर किनवट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्षात कधीच जमले नाही या दोन्ही छोट्या मोठ्या भावांचे आपसातील बेबनाव या विभागातील मतदारांना परिचित आहे. विधानसभेची निवडणूक असो जिल्हा परिषद असो की जिल्हा बँकेची निवडणूक हे दोन्ही पक्ष आमने-सामने असतात हे सर्वश्रुत आहे.

असे असताना माहूर किनवटमध्ये काँग्रेसने भाजपच्या मागे फरपटत फिरण्यापेक्षा बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा वचपा काढायला पाहिजे होता. परंतु स्वतःला सहकार क्षेत्रात पितामह म्हणून घेणारे ज्येष्ठ काँग्रेसी नेत्याने भाजपच्या (BJP) सोबत जाऊन स्वता:सह भाजपचा ही चुराडा केला. लोकसभेत नेतृत्व बदलाचे वारे वाहत असून 'इंडिया' आघाडीने याचा चंग बांधला आहे, दुसरीकडे नको तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शूल्लक निवडणुका डोक्यावर घेऊन माहूर-किनवटच्या घराणेशाही ने माखलेल्या काँग्रस ने इस्लापुर पाठोपाठ माहूरमध्ये ही आपली अती महत्वकांक्षा दाखवून माहाविकास आघाडी मधून बाहेर पडत निवडणुका लढल्या आणि त्याचे परिणाम ही भोगले.

माहूर सारखीच अभद्र युती किनवटला सुद्धा असल्याने किमान किनवट तालुक्यात तरी बाजार समितीमध्ये उरली सुरली इज्जत साबुत राहावी म्हणून आता जिल्ह्यावरून त्यांना ताकद देण्यात आल्याची माहिती असून माहूरच्या पराभवानंतर किनवट बाजार समितीच्या मतदारांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यासोबतच उद्या (ता.11) रोजी पर पडणाऱ्या किनवट बाजार समितीमध्ये मात्र मतदाराचे भाव ही वाढल्याने 'वोट के बदले नोट' की चर्चा ऐकायला येत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT