Ajit Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : अजितदादांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट; ‘पहिलं मी रेटून बोलायचो; पण आता दबकत दबकत बोलतोय; कारण माझा भाऊही...’

NCP Political News : आमच्यातील काय काय पुढारी असे आहेत की, त्यांच्या घरातीलच लोकं त्यांच्यासोबत नाहीत आणि बाकीच्यांना उपदेश करत असतात.

Vijaykumar Dudhale

Jalna,15 February : स्वतःच्या घरात काय जळतं ते पहिलं बघितले पाहिजे ना. तर तुम्ही दुसऱ्याचं घर शाबूत ठेवू शकता. आमच्यातील काय काय पुढारी असे आहेत की, त्यांच्या घरातीलच लोकं त्यांच्यासोबत नाहीत आणि बाकीच्यांना उपदेश करत असतात. मी हे पूर्वी रेटून बोलायचो; पण आता दबकत दबकत बोलतोय. कारण, माझा भाऊपण माझ्याबरोबर नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसत हसत बोलून दाखवली.

माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या सभेत अजितदादांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता, तर विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या विरोधात त्यांचा पुतण्या उभा होता. त्या संदर्भाने अजितदादांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

संघर्ष करणं, संकटांशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देणं हेही आमचं काम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार लोकांपर्यत पोचवा. माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक ऊर्जावान चेहरा मिळाला आहे. मागे विजय बांभळेला लोकसभेला उभं केल असताना परतूरमधून लिड होता. याही वेळी राजेश विटेकर यांना परतूरमध्ये लीड होता, असेही अजित पवार यांनी सांगितले.

याच भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना ‘तुझ्या मतदारसंघात लीड होता का,’ अशी विचारणा केली. विटेकर यांनी ‘होता,’ असे उत्तर दिले. त्यावर अजित पवार यांनी विटेकर यांना उद्देशून ‘त्याच्या मतदारसंघात लीड नसता तर त्याला घेतलाच असता’ अशी टिपण्णी केली. त्यावेळी सभेत एकच हशा पिकला.

कॉन्ट्रक्टरनी माझ्या पक्षात येऊ नये

कॉन्ट्रक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नये. कॉन्ट्रक्टरांनी कॉन्ट्रक्टरचे काम करावं. पक्षात यायचं आणि पद घ्यायचं. पदाधिकारीही तोच कॉन्ट्रक्टरही तोच. बिल काढताना तो अधिकारी दहादा विचार करतो. ह्याचं बिल नाही काढावं तर तो दम देतो. थांब तुझी बदलीच करतो. तुला गडचिरोलीच दाखवतो. काम कर ना बाबा. हा पैसा अजित पवारच्या बापाच्या घरचा नाही आणि दुसऱ्याही नेत्यांच्या घराचाही नाही. हा जनतेचा पैसा तो सत्करणी लागला पाहिजे, असा सज्जड दम अजित पवार यांनी या वेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT