Bhagwat Karad Ministry of Finance Farewell  sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad : 2 वर्ष 11 महिन्यानंतर डाॅ.भागवत कराडांना अर्थ मंत्रालयाचा निरोप

Bhagwat Karad Ministry of Finance Farewell : वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून डाॅ. भागवत कराड यांनी दोन वर्ष अकरा महिने इतका काळ या खात्याचा कारभार पाहिला.

Jagdish Pansare

Bhagwat Karad News : राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना आज (बुधवारी) अर्थ मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निरोप देण्यात आला. कराड यांनी आपल्या निवासस्थानी मंत्रीपदाच्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा छोटेखानी सत्कार करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डाॅ. अंजली कराड या देखील उपस्थितीत होत्या.

कराड यांची एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती. तर 7 जुलै 2021 मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले होते. 2 वर्ष 11 महिने त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यकाळ राहिला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपच्या BJP जागा घटल्या. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण यावेळी त्यांना एनडीएच्या मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागला. त्यामुळे सहाजिकच नवे मंत्रिमंडळ बनवताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. त्यामुळे अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या सहकाऱ्यांना संधी देण्यात आली.

मराठवाड्याच्या वाट्याला आलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद नव्या व्यवस्थेत काढून घेण्यात आले. वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून डाॅ. भागवत कराड यांनी दोन वर्ष अकरा महिने इतका काळ या खात्याचा कारभार पाहिला. नव्या रचनेत त्यांना वगळण्यात आल्याने नवी दिल्ली येथे कराड यांना निरोप देण्यात आला.

वित्त मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांनी डाॅ. भागवत कराड त्यांच्या पत्नी डाॅ. अंजली कराड यांना शुभेच्छा देत निरोप दिला. तर कराड कुटुंबाकडून गेली पावणे तीन वर्ष केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या वित्त विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंद यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT