Sunil Tatkare : 'अजित पवारांबरोबर जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावली', सुनिल तटकरेंनी दिलं चोख उत्तर

Ajit pawar Sunil Aatkare Answer organiser rss : विधानसभेच्या अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
Sunil Tatkare, Ajit Pawar
Sunil Tatkare, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare : आरएसएसशी संबंधित 'ऑर्गनायझर’मधील एका लेखात अजित पवारांबरोबर जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावली, अशी टीका केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे.

तटकरे यांना 'ऑर्गनायझर’मधील टीके विषयी विचारले असता ते म्हणाले, 'मी वाचलेलं नाही. मी वाचन करेल माहिती समजून घेईल. मी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला होतो. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांच्याशी दिल्लीत भेटीगाठी झाल्या मात्र कोणताही दुजाभाव पाहायला मिळाला नाही. ⁠या संदर्भात मी वाचेल आणि आत्मचिंतन करेल.'

विधानसभेत चित्र बदलण्याचा विश्वास

सुनील तटकरे Sunil Tatkare म्हणाले, प्रत्येक निवडणूक हे वेगळे परिणाम घेवून येते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील वेगवेगळी समीकरण असतात. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. दलित, मु्स्लिम, आदिवासी समाज घटक आमच्या पासून दूर गेले. या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे. विधानसभेत वेगळं मतदान होते.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Uddhav Thackeray On Mohan Bhagwat : मणिपूरच्या झळा एका वर्षाने संघाच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या, ठाकरेंनी भागवतांना डिवचलं

अजितदादा महाराष्ट्र दौरा करणारा

लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या त्रुटी असलीत त्याचा आम्ही सखोलपणाने विचार करणार आहोत. विधानसभेच्या अधिवेशनानंतर अजित पवार Ajit Pawar महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. निवडणुकीत सोशल माध्यमातून अजित पवारांना टार्गेट केले गेले. मुद्दामहून काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, असे सुनिल तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Jayant Patil : जयंत पाटील अजितदादांकडे! राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com