Sudhakar Badgujar on BJP MLA: '...म्हणून भाजपच्या तीनही आमदारांची राजकीय कारकीर्द संकटात' ; सुधाकर बडगुजरांचं राजकीय भाकीत!

Nahshik Loksabha Election Result and Shivsena Vote : यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेली मते हा फुगा आहे. त्यांनी प्रचंड गैरप्रकार केले, असंही बडगुजर म्हणाले आहेत.
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama

Badgujar warn to BJP News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले आहेत की, 'नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठे यश मिळवले आहे. आता नाशिक शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही आमदारांची कारकीर्द संपुष्टात येईल.'

तसेच, लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या मतदारांनी शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला आहे. ही भारतीय जनता पक्षाच्या शहरातील तिन्ही आमदारांसाठी मतदारांनी दिलेली वॉर्निंग आहे. असंही म्हणाले आहेत.

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar : नाव मोठं लक्षण खोटं, बडगुजरांच्या घरातच ठाकरे गटाला धक्का!

याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना 2019 मध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघात दोन लाख 14 हजार 238 मतांची आघाडी होती. ती आघाडी यंदा शिवसेना ठाकरे गटाने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून 36 हजारांवर आणली आहे.

Sudhakar Badgujar
Chhagan Bhujbal Politics : मंत्री भुजबळ यांच्या उमेदवाराचा लोकसभेत सलग तिसरा पराभव!

बडगुजर(Sudhakar Badgujar) म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेली मते हा फुगा आहे. त्यांनी प्रचंड गैरप्रकार केले. शेवटच्या तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रलोभने दाखविण्यात आली.

सामान्य स्थितीत निवडणूक झाली की, भाजपच्या वाढलेल्या मतांचा फुगा फुटेल व ते जमिनीवर येतील. शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांना हा धोक्याचा इशारा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या कामामुळे या आमदारांची झोप उडाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com