Victim woman lawyer in Ambajogai, Beed, was brutally assaulted by a group led by the village sarpanch sarkarnama
मराठवाडा

Beed Crime : वकील महिलेला मारहाण, काँग्रेस आक्रमक; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Female Lawyer Assaulted Case Registered : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला वकिलाला झालेल्या मारहाण प्रकारणाच्या चौकशी आदेश दिले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महिला वकिलाला मारहाण करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Roshan More

Beed News : अंबाजोगाई कोर्टात प्रॅक्टीस करणाऱ्या महिला वकील ज्ञानेश्वरी आंचल यांना 10 जणांनी मिळून मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला वकीलाचे शरीर काळे निळे पडले होते. मात्र, लगेच गुन्हा दाखल केला नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर हल्लाबोल केला. यशोमती ठाकूर म्हणाल्या, लाडक्या बहिणींचे आम्हीच वाली असं म्हणणारं सरकार गुन्हा नोंदवण्यासाठी नेमकं कशाची वाट बघतंय? की गुन्हेगार पळून जाण्याची वाट बघितली जातेय? मुळात या राज्यात गृहखातं अस्तित्वात आहे की नाही?

महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो. एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

10 जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशी आदेश आपण दिले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महिला वकिलाला मारहाण करणाऱ्या अनंत अंजान (सरपंच) सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्यूजंय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे, नवनाथ मोरे या दहा जणांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

सरकारला जागं होण्याची वेळ

महिला वकीलाला करण्यात आलेली बेदम मारहाण अतिशय संतापजनक असून झोपेचं सोंग घेतलेल्या सरकार आणि गृहखात्यानं जागं होण्याची वेळ आहे. राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. अशावेळी गृहखातं केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर ही शरमेची बाब आहे, असा टोला यशोमती ठाकूर यांनी सरकारला लगावला होता.

आरोपींवर मकोका लावा

मारहाण झालेल्या वकील ज्ञानेश्वरी आंचल यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत करण्यात यावी त्यांना तुरुंगातून बाहेर काढू नये अन्यथा ते आपला खून करतील, अशी भीती देकीख ज्ञानेश्वरी यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT