Solapur Shocking News: रुग्णांसाठी 'Hands Of God', पण त्याच हातांनी केला स्वतःचा घात; सोलापूरमधील न्यूरोलॉजिस्ट शिरीष वळसंगकरांची आत्महत्या

Dr. Shirish Valsangkar Suicide : सोलापूर शहरात वळसंगकर यांचं मोठं नाव होतं. पण ज्या रुग्णालयात त्यांनी हजारो कित्येक रुग्णांवर उपचार केले. त्यांनी जीवनदान दिलं त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी (ता.18) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
Dr. Shirish Valsangkar.jpg
Dr. Shirish Valsangkar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापुरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्या रुग्णालयात एक ना दोन अशा हजारो रुग्णांना जीवदान दिलं,त्याचठिकाणी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडून घेत आत्महत्या केली आहे. यामुळे सोलापूर (Solapur) शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर शहरातील त्यांच्या मोदी परिसरात असलेल्या घरी टोकाचं पाऊल उचलत स्वतःवर गोळी झाडत जीवनयात्रा संपवली. डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सोलापूर शहरात वळसंगकर यांचं मोठं नाव होतं. पण ज्या रुग्णालयात त्यांनी हजारो कित्येक रुग्णांवर उपचार केले. त्यांनी जीवदान दिलं, त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी (ता.18) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

Dr. Shirish Valsangkar.jpg
Dhananjay Munde News : सहकारमंत्री पाटील म्हणाले, अर्धांगवायूचा झटका; धनंजय मुंडेचं ट्विट करत मोठं स्पष्टीकरण

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण त्यांचा गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.

डॉ.शिरीष वळसंगकर यांची सोलापूर,महाराष्ट्रचं नव्हे तर देशविदेशातील अनेक रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय सेवेत आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या आत्महत्येमागेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.

Dr. Shirish Valsangkar.jpg
Anjali Damania News : अंजली दमानिया पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर तटकरेंसोबत फडणवीसही...काय आहे प्रकरण..?

डॉ. शिरीष वलसंगकर यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून घेतलं. तसेच शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी प्राप्त केले होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com