Maharashtra Canbineat News Sarkarnama
मराठवाडा

Cabinet expansion news: मराठवाड्यातून मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत 'ही' पाच नावे?

Five ministers from Marathwada will take oath : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात उद्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. गेल्या मंत्रीमंडळातील काही जुने चेहरे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पुन्हा दिसणार आहेत.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : अखेर राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला उद्या (ता.15) नागपूरात मुहूर्त लागणार आहे. (Atul Save) महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या याद्या अंतिम झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळात मराठवाड्यातून पहिल्या टप्प्यात पाच जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यात भाजप दोन, राष्ट्रवादी दोन तर शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. (Sanjay Shirsat) यात माजी मंत्री औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे,औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा समावेश असणार आहे. बीड जिल्ह्याला देखील दोन मंत्रीपंद मिळणार असून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे बहिण-भावाची वर्णी निश्चित समजली जात आहे. या शिवाय लातूरमधून माजी मंत्री संजय बनसोडे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात उद्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. गेल्या मंत्रीमंडळातील काही जुने चेहरे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पुन्हा दिसणार आहेत. तर काही नावांना डिच्चू देऊन नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पत्ता जवळपास कट झाल्याची माहिती आहे.

त्यांच्याऐवजी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आणि सध्या सिडकोचे अध्यक्ष असलेल्या संजय शिरसाट यांची थेट कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये शिरसाट यांना वेटिंगवर ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या मंत्रीपदाचे तिकीट कन्फर्म होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडबुक मध्ये असलेल्या अतुल सावे यांना भाजपकडून पुन्हा संधी दिली जाणार आहे.

जिल्ह्यातून काही नव्या चेहऱ्यांची चर्चा होती, मात्र तुर्तास या नावावर विचार होणार नाही, असे दिसते. भाजपच्या नेत्या विधान परिषदेतील आमदार पकंजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा दुसरा टप्पा म्हणून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे समजते. या शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांना पुन्हा राष्ट्रवादीकडून संधी दिली जाणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून झालेली हत्या, परळीतील व्यापाऱ्याचे खंडणीसाठी झालेले अपहणर, पवन उर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा पाहता मुंडे यांना मंत्रीमंडळातून वगळले जाईल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरू आहे. मात्र या घटनांचा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर काही परिणाम होणार नाही असे दिसते. राष्ट्रवादीच्याच कोट्यातून उदगीरचे आमदार व माजी मंत्री संजय बनसोडे हे ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT