Shivsena Politics : शिवसेनेला मंत्रिपद मिळणार 10 ते 12? दावेदार 20 ते 22; एकनाथ शिंदे विधानपरिषदेचे सभापतीपद खेचून घेणार

Maharashtra Mahayuti Cabinet Allocation Dispute : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात विधानपरिषद सभापतीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता अधिक आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच कायम दिसतो. कोणाला किती मंत्रिपद मिळणार यावर अजूनही सहमती नाही. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त अजून कायम आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरूच आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिंदेंकडून किती सहमती मिळणार, यावर बरच काही अवलंबून आहे. यातच आता मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विधानपरिषदेचे सभापतीपद जाण्याची शक्यता आहे.

महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर नाराज आहे. सहमती त्यांच्याकडून दिला जात नसल्याचे वृत्त आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रि‍पदासाठी दावेदार अधिक असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सत्तेत इतर पदांवर डोळा ठेवून शिवसेनेतील नेत्यांची, आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत. हेच त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण असल्याचे आता समोर येऊ लागले आहे.

Eknath Shinde
Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंकडून खात्यांची 'लिस्ट' वाढली, बसलेत अडून? भाजपकडून मनधरणी, तरच मंत्रिमंडळाचा शपथविधी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्याकडे दावेदार 20 ते 22 आहे. त्यामुळे कसे होणार? यातून शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सत्तेत इतर पदे कसे मिळता येतील, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यातून विधानपरिषदेचे सभापतीपद खेचून घेण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी पुन्हा केली आहे.

Eknath Shinde
Dinvishesh 13 December : गोव्याचे 10 वे मुख्यमंत्र्यांचा जन्म आणि बरचं काही; वाचा आजचे दिनविशेष

भाजप-शिवसेनेत पुन्हा रस्सीखेच

विधानपरिषदेचे सभापतीपद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. शिवसेनेच्या नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सभापती करण्याचा प्रस्ताव शिंदेंकडून भाजपला देण्यात आला होता. परंतु भाजपने या पदावर दावा सांगितल्याने हे पद अजून रिक्त आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे कामकाजाचा ताण कमी व्हावा, यासाठी त्यांनी विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधानपरिषदेचे सभापतीपद मागितले आहे. यावर महायुतीत निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु भाजप गेल्या अडीच वर्षांपासून या पदावर अ़डून बसल्याने ते पद सहजासहजी हे पद सोडणार नाही, असे दिसते.

फिरते मंत्रिपद राहणार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिपदाचे 20 ते 22 प्रबळ दावेदार आहेत, सगळ्यांना संधी मिळणे शक्य नाही. यामुळे काही जणांना अडीच वर्षे, तर काही जणांना उरलेली अडीच वर्षे मंत्रिपदे द्यावीत, म्हणजे फिरती मंत्रिपद ठेवण्याचा विचार एकनाथ शिंदे करत आहेत.

गृहमंत्री, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जलसंपदा, या चारपैकी एक महत्त्वाचे खाते आम्हाला द्या, असा आग्रह शिंदेंचा आहे. नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com