BJP Leadership Changes : नव्या वर्षात भाजपमध्ये होणार मोठे फेरबदल; राष्ट्रीय अध्यक्षासह 'या' निवडणुकांवर भर

New Year New National President of BJP : भाजपने आता येत्या काळात भाजपमधील संघटनात्मक पातळीवर होत असलेल्या निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे येत्या काळात संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या दोन महिन्यात चार राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने बाजी मारली तर झारखंडमध्ये शिबू सोरेन यांच्या पक्षाने बाजी मारली. त्यामुळे भाजपचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. त्यामुळेच भाजपने आता येत्या काळात भाजपमधील संघटनात्मक पातळीवर होत असलेल्या निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे येत्या काळात संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. येत्या काळात लवकरच भाजपला नव्या वर्षात नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपद हे जानेवारी 2020 पासून जे.पी नड्डा यांच्याकडे आहे. 2023 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता, त्यानंतर त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता या पदावर येत्या काळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत भाजपकडून निम्म्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

BJP Flag
Gadchiroli BJP : गडचिरोलीचा विधानपरिषदेसाठी भाजपने विचार करावा; 'या' बड्या नेत्यांचा आग्रह

महाराष्ट्र, झारखंड या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांची तयारी केली जात आहे. ज्या राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. ते राज्य वगळता सदस्यता अभियानानंतर संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील. जानेवारी 2025 च्या मध्यापर्यंत निम्म्या राज्यांतील निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

BJP Flag
Uddhav Thackeray Video : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन, नेमंक कारण काय?

संघटनात्मक पातळीवर होणार मोठे फेरबदल

भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत भाजपकडून निम्म्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

BJP Flag
Ambadas Danve : राजकीय दबावात काम करु नका, अंबादास दानवेंनी घेतली बीड एसपींची भेट!

नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

बुथ पातळीवरील निवडणुका सध्या अनेक राज्यांमध्ये पूर्ण झाल्या आहेत. भाजपचे पुढील अध्यक्ष कोण होणार ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भाजपचे नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमक्या कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करणार यावर ही निवडणूक अवलंबून असणार आहे.

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालांमुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पोटनिवडणुकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नवी ताकद दिली आहे. त्यामुळे लोकसभेत स्वबळावर बहुमत नसतानाही पक्षाला पुन्हा गती मिळाली आहे. त्यामुळे आगामे काळात होत असलेल्या भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता लागली आहे.

BJP Flag
NCP Sharad Pawar: शरद पवारांनी फिरवलेली भाकरी कोण पचवणार? उसने उमेदवार पक्षासाठी तारणहार ठरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com