Bombay High Court bench Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

High Court News : नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणुकीचा आरोप; रामकृष्ण बांगरसह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर!

Former Chairman Ramkrishna Bangar along with four others granted anticipatory bail by the court : बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर आहे. राजकीय वैर असल्याने आणि बांगर यांनी निवडणूक लढवू नये व त्या काळात अडसर ठरू नये, यासाठी 18 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2024 या काळात बांगर यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले.

Jagdish Pansare

Beed Political News : पाटोदा (जि. बीड) येथील कृउबाचे माजी सभापती, महानंदचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्ह्यातील शिक्षण, सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामकृष्ण बांगर यांच्यासह त्यांचा मुलगा विजय बांगर, पत्नी सत्यभामा बांगर, मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोकरीसाठी रक्कम घेऊन फसवणूक केली.

त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून धमकावणे, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामकृष्ण बांगर यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad High Court) न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी मंजूर केला. याप्रकरणी अमोल वाघमारे यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली आहे.

बांगर यांनी त्यांच्या संस्थेत नोकरी लावण्यासाठी सुरुवातीला चार लाख घेतले व नंतर सहा लाखांची मागणी केली. (Beed News) नंतर काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर चार लाखांची मागणी केली असता मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तर बांगर यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 18 टक्के भाजलो असल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत नमूद केले. खंडपीठात युक्तीवाद करताना विविध मुद्दे मांडण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणात सी-समरी अहवाल दिला आहे. रामकृष्ण बांगर यांच्याविरोधात कुभांड रचण्यात आले असून, त्यांचे व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर आहे. राजकीय वैर असल्याने आणि बांगर यांनी निवडणूक लढवू नये व त्या काळात अडसर ठरू नये, यासाठी 18 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2024 या काळात बांगर यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणात सुनावणीनंतर बांगर यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. बांगर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

कोण आहेत रामकृष्ण बांगर..

रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यात सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था देखील आहेत. महानंदचे ते उपाध्यक्ष देखील होते. पाटोदा बाजार समितीची जमीन बळकावून त्यावर शिक्षण संस्था उभारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या संदर्भात तत्कालीन सचिव, सभापतींनी उपजिल्हा निबंधकांकडे तक्रारही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT