
Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल याच्यासह चौघांविरोधात बीड पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर गुन्हा नोंदवला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे वकील माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेसाहेब देशमुख यांचा बीड पोलिस दलातील बॉडीगार्ड मोहन दांडगे यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघातील एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांना बीड (BEED) पोलिसांनी मोहन दांडगे यांची बॉडीगार्ड म्हणून नियुक्ती केली होती. निवडणुकीवेळी परळीतील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुखांचे सहकारी वकील माधव जाधव यांना बँक काॅलनी मतदान केंद्रावर कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर चौघा साथीदारांनी मारहाण केली. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2024ला सकाळी अकरा वाजता झाल्याचे बॉडीगार्ड मोहन दांडगे यांनी जबाबात म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघातील एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांना बीड (BEED) पोलिसांनी मोहन दांडगे यांची बॉडीगार्ड म्हणून नियुक्ती केली होती. निवडणुकीवेळी परळीतील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुखांचे सहकारी वकील माधव जाधव यांना बँक काॅलनी मतदान केंद्रावर कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर चौघा साथीदारांनी मारहाण केली. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2024ला सकाळी अकरा वाजता झाल्याचे बॉडीगार्ड मोहन दांडगे यांनी जबाबात म्हटले आहे.
राजेसाहेब देशमुख मतदान (Vote) केंद्रावर जात असताना, मी बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या मागे जात होतो. त्यावेळी कैलास फड तिथं होता. त्याने मला मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले. पोलिस असून, त्यांचा बॉडीगार्ड आहे, हे सांगून देखील कैलास फड याने रोखले. 'कशाचा बॉडीगार्ड अन् कशाचा पोलिस', असे म्हणत आडवले. याचवेळी कैलास फड याचा मुलगा निखिल याने देखील कोणीच मध्ये जायचे नाही, असे म्हणून हाताने थांबण्याचा इशारा केला. याचवेळी तिथं वाहनातून काही लोक राजकीय घोषणाबाजी करत आले.
राजेसाहेब देशमुख यांच्याबरोबर असलेले वकील माधव जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्कांनी मारहाण सुरू होती. ही मारहाण सोडवली, असे जबाबात बॉडीगार्ड मोहन दांडगे यांनी म्हटले आहे. याच जबाबावरून बीड पोलिसांनी वेगवेगळ्या कलमातंर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
कैलास फड याच्यावरती गेल्या महिनाभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक देखील झाली होती. त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. आता पुन्हा कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड याच्यासह चौघांविरुद्ध विधानसभा निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.