Police action initiated in the Vilas Cooperative Factory fraud case involving 79 contractors over alleged financial misconduct. sarkarnama
मराठवाडा

Crime New : 79 ठेकेदारांविरूद्ध गुन्हा! विलास सहकारी कारखान्याची फसवणूक, कोट्यवधींचा फटका

Vilas Cooperative Factory Fraud Case Latur : कारखान्याची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

युवराज धोतरे

Latur News : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोनमध्ये ठेकेदारांनी उचल घेऊन काम न करता कारखान्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उचल पोटी तब्बल 2 कोटी 86 लाख 85 हजार 967 रुपये ठेकेदारांनी घेतले. परंतु कामही केले नाही आणि वारंवार उचल रक्कमेची मागणी करून ती परतही दिली नाही. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 79 ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी श्रीराम गंगाराम पाटील (वय 53, मुख्य शेतकी अधिकारी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठेकेदारांनी कारखान्यासोबत ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी लेखी करार करून उचल रक्कम घेतली. मात्र, करारानुसार काम न करता काही ठेकेदार अर्धवट काम सोडून गेले, तर काही कामावर हजरच राहिले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदारांना उचल रक्कम कारखान्याला परत केली नाही.

पावणे तीन कोटीहून अधिकची ही रक्कम असल्याने कारखान्याच्या वतीने या ठेकेदारांविरूद्ध उदगीर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राम बाबु चव्हाण (रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी), मारोती राम राठोड (रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी), श्रीराम रामचंद्र राठोड (रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी) या प्रमुख ठेकेदारांचा समावेश आहे.

तर तुकाराम सिताराम पवार (रा. राळगा, ता. अहमदपूर, जि. लातूर), पंढरीनाथ भानुदास बनसोडे (रा. लोहारा, ता. उदगीर, जि. लातूर), बाबासाहेब हरिभाऊ राठोड (रा. परसोबा तांडा, ता. धारुर, जि. बीड), अजय परसराम जाधव (रा. असरडोह, ता. धारुर, जि. बीड), खोब्राजी आनंदा जोंधळे (रा. पिंपळगाव (ढगे), ता. लोहा, जि. नांदेड), मोसीन रफीक शेख (रा. अर्धमसला, ता. गेवराई, जि. बीड), रमेश अंबादास बडे (रा. चिंचवणी, ता. वडवणी, जि. बीड) यांच्यासह एकूण 79 ठेकेदारांचा समावेश आहे.

हा प्रकार 1 एप्रिल 2022 ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत घडला असून, कारखान्याची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, उर्वरित आरोपींचा शोध व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे सहकारी संस्थांमध्ये करार प्रक्रियेत पारदर्शकता व जबाबदारीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT