gauri lankesh murder accused shrikant pangarkar Sarkarnama
मराठवाडा

Gauri Lankesh Murder: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Vidhan Sabha Election Gauri Lankesh Murder accused shrikant pangarkar joined shiv sena:श्रीकांत पांगारकरचा नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही सहभाग होता. याचवर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पांगारकर आणि इतर चार सहआरोपींना जामीन मंजूर केला होता.

सरकारनामा ब्यूरो

Shrikant Pangarkar: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या (Gauri Lankesh Murder) प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते,माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीतत पांगारकर यांनी प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांची शिवसेना जालना विधानसभेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

"श्रीकांत पांगारकर (shrikant pangarkar) हे माजी शिवसैनिक आहेत आणि ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", अर्जून खोतकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

"पांगारकर हे माजी शिवसैनिक असून ते पक्षात परतले आहेत. त्यांची जालना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे," असे खोतकरांनी माध्यमांना सांगितले.

२०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती. यातील आरोपी श्रीकांत पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.महाराष्ट्रातील तपास यंत्रणेच्या मदतीने कर्नाटकातील पोलिसांनी केलेल्या तपासात अनेकांना अटक केली होती.

पांगारकर याला ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. या वर्षी 4 सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. 2011 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर पांगारकर उजव्या विचारसरणीच्या हिंदू जनजागृती समितीमध्ये सामील झाला.

श्रीकांत पांगारकरचा नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही सहभाग होता. याचवर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पांगारकर आणि इतर चार सहआरोपींना जामीन मंजूर केला होता. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलवर हल्ला करण्याचा कट आणि त्यासाठी शस्त्रसाठा केल्याच्या प्रकरणात त्याला अटक केली होती.

गौरी लंकेश (55) यांची 5 सप्टेंबर, 2017 रोजी त्यांच्या बेंगळुरूतील घराबाहेर 7.65mm देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT